तरुणीची गळफास लाऊन आत्महत्या

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
मालेगांव,
suicide शहरातील महसुल कॉलनी मध्ये रहिवासी असलेले शिक्षक डिगांबर आनंदा मोकळे यांच्या २१ वर्षीय मुलीने घरातील पंख्याला लटकून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २४ एप्रिल रोजी दुपारी घडली . सदर मुलगी ही फिजिओथेरपी या अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी नांदेड येथे शिकत होती .
 

sucide 
 
निकिता डिगांबर मोकळे हीचे वडील डिगांबर मोकळे हे तालुयातील राजुरकर विद्यालय राजुरा येथे शिक्षक असून, त्यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी निकिता ही फिजिओथेरपी प्रथम वर्षाला नांदेड येथे शिकत होती. २२ एप्रिल रोजी ती तिचा प्रॅटिकलचा पेपर न देता ती घरी परत आली होती. ती जेव्हा घरी आली तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये होती . कुटूंबियांनी निकिताची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला होता. २४ एप्रिल रोजी सकाळी साडेतीन वाजता वडिल व तिची लहानी बहिण अंकिताचा पेपर असल्याने तिवसा जिल्हा अमरावती येथे गेले होते. पेपर संपवून दुपारी चार वाजताच्या सुमारास मालेगाव येथे घरी परत आले असता निकिता हिने घरातील सिलिंग पंख्याच्या हुकला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले.suicide या घटनेची फिर्याद मालेगाव पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन फिर्यादी व डॉटरांच्या अहवालावरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.