कर्मचार्‍यांच्या मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा आवश्यक: एम. मुरुगानंथम

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
Mental Health नियमित योग किंवा व्यायाम, संतुलित आहार घेतल्यास प्रकृती उत्तम व निरोगी राहू शकते. कुठलेही व्यसन न बाळगता जीवनशैली बदलून मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना आरोग्य कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. भविष्यात कर्मचार्‍यांसाठी आरोग्य विषयक कार्यशाळा व योग शिबीर यांचे आयोजन करण्यात येतील, असे जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी सांगितले.
 
 
 वसुंधरेचे रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य: न्या. विक्रम आव्हाड जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या आरोग्याचे दृष्टीने एक दिवसीय मानसिक आरोग्य कार्यशाळेचे आयोजन 24 एप्रिल रोजी स्व.वसंतराव नाईक सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांचा समावेश असतो. ग्रामीण भागातील जनतेच्या विविध योजना व कार्यक्रमाचे महत्त्वाचे नियोजन करण्यात येतात. अशा प्रसंगी अधिकारी व कर्मचार्‍यांची दमझाक होते.Mental Health  सद्यस्थितीत जीवनशैली बदलामुळे कर्मचारी व अधिकार्‍यांना रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉईड असे विविध आजार बळावलेले असतात. तसेच कामाच्या ताणामुळे मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता असते. आरोग्य कार्यशाळेच्या माध्यमातून योग्य समुपदेशातून त्यांचे आरोग्य संतुलीत राखण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मानसिक आरोग्य तज्ञ डॉ. लोकेश चिर्वतकर, मानसोपचार डॉ. अजित वागदे यांनी शासकीय कामे करताना मानसिक आजार, ताणतणाव, वर्तणुक उपचार, समुपदेशन, चिंतारोग, निद्रानाश, चिडचिडेपणा, व्यसन आदी बाबींवर मार्गदर्शन केले. मानसोपचार डॉ. अजित वागदे यांनी दैनंदिन कामे करताना मेडिटेशन नियमित करण्याचे फायदे सांगितले.