व्यावसायिक नैतिकतेचे पालन करा : डॉ. मूर्ती

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
सालेकसा,
Dr.murti विद्यार्थी जीवनात आणि शिक्षकी पेशामध्ये तसेच अन्य व्यवसायातील कर्मचार्‍यांनी आपल्या कामामध्ये व्यवसायिक नैतिकतेचे पालन करावे. जे शक्य आहे ते आपने कार्य जबाबदारीने व चांगल्यारितीने पार पाडावे, असे आवाहन डॉ. एस. नारायण मूर्ती यांनी केले.
 

dr murti 
 
येथील शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालयात 24 एप्रिल रोजी आचारसंहिता देखरेख समितीच्या वतीने व्यावसायिक नैतिकता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयक्यूएसीच्या समन्वयक डॉ. पी. एस. ठाकूर होते. डॉ. ठाकूर यांनी महाविद्यालयाची आचारसंहिता आणि व्यावसायिक नैतिकता यावर प्रकाश टाकला.Dr.murti  कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन समितीचे प्रमुख डॉ. संतोष पुरी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. मच्छिंद्र नंदेश्‍वर यांनी मानले. आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.