मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

१ हजार ७६ मतदान केंद्रांवर ७ हजार ७१९ कर्मचारी नियुक्त

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
चोख पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध
वाशीम,
voting लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ अंतर्गत दुसर्‍या टप्प्यातील मतदानासाठी यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया शुक्रवार, २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विविध माध्यमातून जनजागृती केली आहे. जिल्ह्यातील नव मतदार आणि महिलांनीही या लोकशाही उत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले मतदानाचे अधिकाराचे वापर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.
 

voting 
 
जिल्ह्यात एकूण ९ लाख ७९ हजार २३७ मतदार आहेत. त्यापैकी ५ लाख १० हजार ८१४ पुरुष, ४ लाख ६८ हजार ४०७ महिला तर १६ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्यातील ३३- रिसोड हा विधानसभा मतदारसंघ ६-अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. तसेच ३४-वाशीम आणि ३५- कारंजा विधानसभा मतदारसंघ हे १४-यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात. जिल्ह्यात एकूण १ हजार ७६ मतदान केंद्र असून त्यात महिला-३ दिव्यांग-३ युवा-३ आणि ६३ आदर्श मतदान केंद्राचाही समावेश आहे. या तिन्ही मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेत ७ हजार ७१९ अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ६ हजार ६४६ पुरुष व १ हजार ७३ महिला अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिसोड मतदारसंघात १ लाख ६५ हजार ७७२ पुरुष मतदार १ लाख ५० हजार १५७ महिला असे एकूण तीन लाख १५ हजार ९२९ मतदार आहेत तसेच दिव्यांग मतदार २ हजार ८६३ तर ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार ३ हजार ९३२ आहेत. रिसोड विधानसभा मतदार संघात एकूण ३३७ मतदान केंद्र आहेत. त्यात महिला-१ दिव्यांग-१ युवा-१ आणि आदर्श-१ मतदान केंद्राचाही समावेश आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघात ३८६ मतदान केंद्र आहेत. त्यात महिला-१ दिव्यांग-१ युवा-१ आणि आदर्श-१ मतदान केंद्राचाही समावेश आहे. ३५६,५७२ एकूण मतदारांपैकी १ लाख ८६ हजार २०७ पुरुष आणि १ लाख ७० हजार ३५७ महिला मतदार आहेत तसेच आठ तृतीय पंथी मतदारही आपले मत अधिकार वापरतील. २९२३ दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ५४३८ मतदारांचाही यात समावेश आहे.
कारंजा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ६ हजार ७३६ मतदार असून १ लाख ५८ हजार ८३५ पुरुष १ लाख ४७ हजार ८९३ महिला व आठ तृतीयपंथी मतदार आपल्या मताधिकाराचे वापर ३५३ मतदान केंद्रांवर करतील उपरोक्त मतदान केंद्रांपैकी एकूण ५४० मतदान केंद्रांवर लाईव्ह कास्टिंग करण्यात येणार आहे मतदान केंद्रांवर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे या निवडणुकीमध्ये मतदारांना त्यांचे नाव मतदार यादी मध्ये नाव मतदान केंद्र ही तपशील शोधण्याकरिता टोल फ्री क्रमांक १९५० उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच तिन्ही मतदारसंघाचे तसेच तहसील स्तरावर मतदार मदतनीस कक्ष स्थापन करण्यात आला आहे मतदारांना २४ एप्रिल पर्यंत ९१.७८ वोटर स्लिप वाटप करण्यात आलेले आहे.voting  जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी कळविले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले आहेत.