गोटानपार घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या :अर्चना मडावी

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
सालेकसा,
Archana Madavi देवरी तालुक्यातील गोटानपार येथे बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, विनयभंग करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ही मानवी मन हेलावणारी घटना आहे. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्या तथा बेटी पढाओ बेटी बचाओ जिल्हा संयोजिका अर्चना मडावी यांनी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 


fgf 
 
निवेदनानुसार, गोटानपार येथील 19 एप्रिल रोजीची घटना ही अमानवीय आहे. या घटनेचा निषेध आहे. हे प्रकरण जलद न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. याप्रकरणी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पीडित कुटूंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.Archana Madavi निवेदन देताना पंचायत समिती सदस्य व बेटी बचाओ बेटी पढाओ गोंदिया जिल्हा संयोजिका अर्चना मडावी, त्याचप्रमाणे कविता येटरे, दिपाली बारसे, संगीता पंधरे, आराध्या पंधरे, लावण्या बारसे, खुशी एकुलकर आदी उपस्थित होते.