देवेंद्र जोशी यांना उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार

    दिनांक :04-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Devendra Joshi : महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे दिल्या जाणारा यावर्षीचा राज्यस्तर उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार यवतमाळचे अभियंता कवी देवेंद्र जोशी यांच्या ‘ही वाट वेगळी' या काव्यसंग्रहाला प्राप्त झाला आहे.
 
 
 
y4May-Waat-Wegali
शनिवार, २७ एप्रिल रोजी पुणे येथे शांता शेळके सभागृहात झालेल्या एका भव्य समारंभात देवेंद्र जोशी यांना हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
 
 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते. व्यासपीठावर महाराट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजन लाखे व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
या प्रसंगी देवेंद्र जोशी यांच्या वृत्तबद्ध कवितेच्या क्षेत्रातील योगदानाचा कौतुकाने उल्लेख झाला. शाल, श्रीफळ, ट्रॉफी व ४००० रुपयांचा धनादेश हे पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांनी हा वृत्तबद्ध कवितेचा गौरव आहे, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.