पूर्व समर्थ नगर येथे संस्कार शिबिर..

    दिनांक :05-May-2024
Total Views |
नागपूर, 
Samarth Nagar लोककल्याण समिती, महिला ( सोमल वाडा) आणि पूर्व समर्थ नगर शाखा यांच्या एकत्रित प्रयत्नातून आज दिनांक ५ मे पासून पूर्व समर्थ नगर येथे  मध्ये सांस्कृतिक समाज भवनसंस्कार शिबिराला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन सोमलवाडा भाग संघचालक विजय भागडीकर यांनी दीप प्रज्वलन करून केले.अनिरुद्ध जोशी यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.विजय भागडीकर यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलांना चांगल्या संस्काराचे महत्त्व गोष्टी रूपाने समजावून सांगितले.लोककल्याण समिती महानगर संयोजिका प्रणिता जांभोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार शिबिरातील प्रशिक्षिका सविता जोशी, कविता राजवाडकर धनश्री देव, शितल शाहू यांनी मुलांकडून विविध कृती करून घेतल्या आणि शिबिराची सुंदर सुरुवात केली.
 
suresh
 
शिबिराला मुलांचा उत्तम प्रतिसाद होता. सहकार्य नगर,राजीव नगर, जुनी अजनी आणि पूर्व समर्थ नगर कॉलनी या विविध वस्तीतून एकूण ४२ मुलं उपस्थित होती.लोककल्याण समिती संयोजिका  सविता जोशी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.या शिबिराला लक्ष्मी नगर संघचालक धनंजय कोंडावार Samarth Nagarतसेच नगर कार्यवाह सुरेश देव, पूर्व समर्थ नगर कार्यवाह शरद देशपांडे, शाखा मुख्य शिक्षक अजय टोळ, लक्ष्मी नगर सेवाप्रमुख  अनिरुद्ध जोशी,सह सेवा प्रमुख सुरेश चव्हारे, ज्येष्ठ स्वयंसेवक वसंत गाडगे हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.
सौजन्य : सुरेश चव्हारे,संपर्क मित्र