माधुरीराजे भोसले यांच्या उपस्थितीत संस्कार शिबीराचा समारोप

    दिनांक :05-May-2024
Total Views |
नागपूर, 
Madhuri Raje नवयुग प्राथमिक शाळा राजाबाक्षा येथे  सुरु असलेल्या उन्हाळी संस्कार शिबीराचा समारोप करण्यात आला.आला.हे शिबिर  २२  ते ३०एप्रिल या दरम्यान  घेण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माधुरीराजे भोसले होत्या.भारतीय शिक्षण मंडळाच्या सहकार्यवाह ऋचा हळदे यांनी अध्यक्षपद भूषविले होते.
 
raje
 
विद्यार्थ्यांनी  या १० दिवसीय शिबिरामध्ये अवगत केलेल्या कलागुणांचे प्रात्यक्षिक पाहुण्यांसमोर सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिल्पा ठाकरे यांनी केले,Madhuri Raje तर आभार प्रदर्शन  शिबीर प्रमुख राकेश कडू यांनी केले . शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सौजन्य:वर्षा नरसापुरकर, संपर्क मित्र