दिव्यांग मतदारांसाठी ‘सक्षम अ‍ॅप’ फायदेशीर

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
- नवीन मतदार नोंदणी, दुरुस्तीची सुविधा

यवतमाळ, 
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी 'Saksham  App'‘सक्षम अ‍ॅप’ कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये नवीन मतदारांना नोंदणी, दुरुस्तीसह आवश्यक असलेल्या सुविधांबाबतही मतदारांना मागणी नोंदविता येणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील सर्वच दिव्यांग मतदारांनी अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  ‘फॅशन डिझायनिंग’मध्ये हिवरासंगमच्या अभिजितची उत्तुंग भरारी
 
 
'Saksham  App'‘
 
पाच दिवसांपासून बीएसएनएलचे ब्रॉडबँड बंद  सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे आहे. जिल्ह्याभरातील एकूण 19 लाख 40 हजार 916 पैकी 16 हजार 650 दिव्यांग मतदार आहेत. यात प्रामु‘याने उमरखेड 3 हजार 29, दिग‘स 2 हजार 750, आर्णी 2 हजार 613, राळेगाव 2 हजार 189, यवतमाळ 1 हजार 876, वणी 1 हजार 755 मतदारांचा समावेश आहे. त्या अनुषंगाने मतदारसंघातील 2 हजार 225 मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहे. असे असले तरी दिव्यांग मतदारांचा टक्का निवडणुकांमध्ये अत्यल्प राहतो. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी सक्षम अ‍ॅप कार्यान्वित केला आहे.
 
 
या 'Saksham App'‘ अ‍ॅपच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी करता येते. त्याचप्रमाणे दिव्यांग मतदार फॉर्ममध्ये दुरुस्ती, मतदाराबाबत माहिती, नोंदणी रद्द करणे, तसेच आधार क‘मांक जोडणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व दिव्यांग मतदारांनी सक्षम अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून सुविधांचा लाभ घ्यावा आणि शंभर टक्के मतदान करावे. कुठलीही अडचण निर्माण झाल्यास नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन दिव्यांग नोडल अधिकारी पीयूष चव्हाण यांनी केले आहे.
दिव्यांग मतदारांकरिता नोंदविता येते मागणी
दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. असे असले तरी स्वत: दिव्यांग मतदारांना सक्षम अ‍ॅपच्या माध्यमातून आपली मागणी नोंदविता येते. यात प्रामुख्याने तळमजल्यावरील मतदान केंद्र, रॅम्पची व्यवस्था, चिन्हांकित रस्ता, पार्किंग सुविधा, ब्रेल लिपीतील मतदार स्लिप, डमी बॅलेट शीट, स्वयंसेवक तथा सहायक, व्हीलचेअर, वाहतूक व्यवस्थांचा समावेश आहे.