जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा

    दिनांक :23-Apr-2024
Total Views |
- खाजगी विहिरींचे अधिग्रहण

यवतमाळ, 
water shortage : जिल्ह्यातील सात गावांत खाजगी विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. यावरून टंचाईची झळ आता बसत आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. ग्रामीण भागातील विहिरी, बोअरमधील पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे पिण्यासह वापरण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. अशीच काही परिस्थिती पुसद, वणी, राळेगाव, घाटंजी आणि झरीजामणी तालुक्यातील सात गावांमध्ये निर्माण झाली.  ‘फॅशन डिझायनिंग’मध्ये हिवरासंगमच्या अभिजितची उत्तुंग भरारी
 
 
 water shortage
 (संग्रहित छायाचित्र )
 
 
water shortage : या गावात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे खाजगी विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहे. यात पुसद तालुक्यात 3, वणी, राळेगाव, घाटंजी, झरीजामणी तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. सध्या एप्रिल महिना चालू आहे. तर येत्या काही दिवसांत उष्णता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.  पाच दिवसांपासून बीएसएनएलचे ब्रॉडबँड बंद
 
 
जिप पाणीपुरवठा विभागाने water shortage पाणीटंचाईच्या अनुषंगाने कृती आराखडा बनविला आहे. त्यातून खाजगी विहीर, टँकरच्या माध्यमातून गावात पाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. परंतु मुबलक प्रमाणात पाणी मिळेल की नाही, याची कुठलीही शाश्वती नाही. त्यामुळे किमान मान्सून येईपर्यंत काही गावांना टंचाईच्या झळा सहन करण्याशिवाय पर्यायच नाही. पुसद तालुक्यातील बहुतांश गावात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या असते. सध्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण गावात कामे सुरू आहेत, परंतु ही कामे अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांवर टंचाईला तोंड देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. सध्या तालुक्यातील येलदरी येथे टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.