माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा?

*भाच्याचे प्रेम आले अंगलट

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा,
Anil Deshmukh : काँग्रेसमधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून महाविकास आघाडीची तिकीट आर्वी येथील माजी आमदार अमर काळे यांना देण्यात आली. या सर्व प्रक्रियेत पडद्यामागे अमर काळे यांचे मामा व शरद पवार यांचे विदर्भातील विश्‍वासू अमर काळे यांची अहम भूमिका होती. त्यांनी वर्धेत ठाण मांडून भाच्याची खिंड लढवली. बाहेर जिल्ह्यातील नेत्यांनी मतदार संघातून 48 तास आधी जाण्याचे संकेत असतानाही अनिल देशमुख यांनी आज वर्धा लोकसभा मतदारसंघात सातत्याने भ्रमण केले. दरम्यान, हिंगणघाट येथे ते आल्याचे कळताच 5.47 मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अधिकृत तक्रार करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.  महिलेच्या नांवावर अन्य कोणी केले मतदान!
 
deshmukh
 
 
बोहल्यावर चढण्याआधी 20 नौरोबांनी बजावला हक्क  मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले अमर काळे यांची संपूर्ण निवडणूक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लढवली. त्यांच्या मदतीला माजी पालकमंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी हे वर्धेत डेरेदाखल होते. आदर्श आचार संहितेनुसार बाहेर जिल्ह्यातील नेत्यांनी मतदानाच्या 48 तासांपूर्वी मतदारसंघ सोडणे आवश्यक असते. त्यानुसार या तिघांनीही 48 तासाआधीच वर्धा लोकसभा मतदारसंघ सोडला. मात्र, अनिल देशमुख यांना भाचा अमर काळे यांचे प्रेम स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी आज शुक्रवार 26 रोजी मतदानाच्या दिवशी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हिंगणघाट येथे प्रवेश केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात स्थानिक नेत्यांसोबतही चर्चा केली. या संदर्भात कुणकुण लागल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे 5.47 मिनिटांनी अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली. या संदर्भात पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्यासोबत संपर्क साधला असता कारवाई होईल, असे सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत संपर्क साधला असता यांनी तक्रार नोंदविण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी तरुण भारतसोबत बोलताना सांगितले.