मतदान थांबवून कर्मचार्‍यांची ‘पंगत’

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
- हिवरी मतदान केंद्रावरील अजब प्रकार

यवतमाळ, 
Hivari Polling Station : तालुक्यातील हिवरी येथे मतदान सुरू असताना केंद्राध्यक्ष, कर्मचार्‍यांनी जेवण करण्यासाठी मतदान मध्येच थांबविण्याची अजब घटना घडली. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी नागरिकांना सुमारे अर्धा तास या लोकांनी लटकवून ठेवले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदान सुरू असताना त्यात कोणत्याही पद्धतीचा खोळंबा होऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. मतदान थांबवून अधिकारी, कर्मचार्‍यांना कुठलेही इतर कार्य करता येत नाही. फराळ, जेवणसुद्धा मतदान न थांबवता करावे, असे आदेश आहेत.  हिंगोली लोकसभा मतदार संघात
 
 
y26Apr-Pangat-(1)
 
Hivari Polling Station : मात्र, हिवरी येथील उच्च प्राथमिक शाळा केंद्रावर खोली क‘मांक 4 येथे मतदानासाठी नागरिक रांगेत उभे असताना, मतदान कक्षातील चार अधिकारी व कर्मचारी नाश्ता करण्यासाठी खाली एकत्र बसले. यामुळे दुपारी 2 च्या दरम्यान हा प्रकार घडला. जवळपास 20 मिनिटे मतदान प्रकि‘या बंद होती. यावेळी मतदारांनी ओरड करत, ‘या’ पंगतीचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केले. मतदान केंद्रांवर तैनात सुरक्षारक्षकानेही नागरिकांशी अरेरावी करत त्यांना अडविल्याची तक‘ार नागरिकांकडून करण्यात आली.  बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाचा जनतेला ‘संदेश’
 
 
Hivari Polling Station : या प्रकरणी यवतमाळ तहसीलदार योगेश देशमुख यांना विचारणा केली असता, सर्व अधिकारी कर्मचारी एकाच वेळी नाश्ता करत असताना अचानक मतदारांची गर्दी झाली. त्यावेळी होमगार्डने त्यांना काही वेळ थांबा असे बजावले. या ‘खाऊ’ कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मतदारांनी केली आहे.