यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवारांचे भाग्य मतदानयंत्रात बंद

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
- संध्याकाळी 5 पर्यंत 54.04 टक्के मतदान
- ‘शाई’वरून यवतमाळात राडा

यवतमाळ, 
Yavatmal Washim Lok Sabha Election : यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान प्रकि‘या पार पडली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.04 टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी अधिक प्रमाणात मतदान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रिंगणातील 17 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. जनता कोणाच्या पदरात मतदानाचे दान टाकणार आहे, हे येत्या 4 जून रोजी कळणार आहे. या लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी महाविकास आघाडीतर्फे उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख आणि महायुतीतर्फे शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्यात खरी लढत झाली आहे.  बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाचा जनतेला ‘संदेश’
 
 
y26Apr-Kendra
 
Yavatmal Washim Lok Sabha Election : यवतमाळ शहरातील छोटी गुजरी मतदान केंद्रावर मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटप करून एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होते. त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशांचे वाटप केल्या जात होते. विशिष्ट भागातील या मतदारांनी मतदान करू नये याकरिता पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेस व उबाठा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात याबाबत धाव घेऊन या प्रकरणातील व्यक्तींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडूनच करण्यात आली आहे. महाविकासचे उमदेवार संजय देशमुख यांनी शहर पोलिस ठाण्यात येऊन याबाबत तत्काळ तक्रार दाखल करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली. झालेल्या मतदान प्रक्रियेत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 10 लाख 48 हजार 857 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष 5 लाख 59 हजार 248, महिला 4 लाख 89 हजार 588, तर इतर 21 मतदारांचा समावेश आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात
‘त्या’ व्यक्ती पसार
काँग्रेस व उबाठा शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या आरोपांमुळे निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता त्या व्यक्ती पळून गेल्या. मात्र बोटाला लावल्या जात असलेली शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावाचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले आहे.
दिव्यांग बांधवांनी केले स्वागत
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे यवतमाळ शहरातील काही मतदान केंद्रांवर दिव्यांग बांधवांनी मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे स्वागत केले. दिव्यांग बांधवांच्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान
विधानसभा झालेले टक्केवारी
मतदारसंघ मतदान
---------------------------
दिग्रस - 1,88,460 57.06 टक्के
कारंजा - 1,54,626 50.41 टक्के
पुसद - 1,64,163 53.18 टक्के
राळेगाव - 1,72,992 61.50 टक्के
वाशीम - 1,91,864 53.81 टक्के
यवतमाळ - 1,76,752 49.46 टक्के