Tarun Bharat   Like Minded

Updated at: 17/04/2014 01:28:15
     
तुमचे शहर निवडा
यवतमाळ
पशू चिकित्सालयात औषधांचा तुटवडा

तभा वृत्तसेवा महागाव, १३ एप्रिल तालुक्यातील काळी दौलतखान परिसरात मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय केला जातो. शासनाने पशू चिकित्सालयाची निर्मितीही केली आहे. मात्र या पशू चिकित्सालयात नेहमीच औषधांचा तुटवडा असतो. तसेच जनावरांवर उपचारासाठी डॉक्टरांचीही ..

उमरखेडचे वसंत टॉकीज अखेर जमीनदोस्त!

धनंजय कुदे उमरखेड, १३ एप्रिल सुमारे अर्धशतकाहून जास्त काळपर्यंत उमरखेड शहराचे भूषण ठरून तालुक्यातील सिनेरसिकांचे आकर्षण असलेली वसंत टॉकीज अखेर बंद झाली आणि आता पाडल्या गेली. बांधकामाचा मलबा शहराबाहेर हलवल्या गेला. आता शिल्लक राहिल्या आहेत केवळ ..

उत्तरप्रदेशच्या कंपनीला २७ लाख रुपये दंड

तभा वृत्तसेवा घाटंजी, ११ एप्रिल औषधाची फवारणी केल्यानंतर पिकाची वाढ होण्याऐवजी खुंटली. या प्रकरणी शेतकर्‍यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात न्यायालयाने शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय देत उत्तरप्रदेशातील औषध निर्मात्या ..

निवडून कोण येणार?

आता महिनाभर नुसती चर्चा तभा वृत्तसेवा यवतमाळ, ११ एप्रिल यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक गुरुवार, १० एप्रिल रोजी आटोपली. आता मतमोजणी एकदम १६ मे रोजी होणार आहे. सुमारे महिनाभराने मतमोजणी होणार असल्यामुळे आता मतदारसंघातील जनता, राजकीय कार्यकर्ते ..

रास्त भाव दुकानदाराचा भोंगळ कारभार

तभा वृत्तसेवा वणी, १० एप्रिल तालुक्यातील गोवारी (पार्डी) येथील रास्त भाव दुकानदारापासून होणार्‍या त्रासामुळे नागरिकांसह सरपंचही त्रस्त झाले आहेत. याबाबत आता माहितीच्या अधिकारात माहिती मागण्यात आली असून तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले आहे. गोवारी ..

न वापरलेल्या कृषीपंपाचे बिल ४५ हजार रुपये !

तभा वृत्तसेवा यवतमाळ, १० एप्रिल महावितरणने न वापरलेल्या कृषी पंपाचे ४५ हजार रुपयांचे बिल पाठवून शेतकर्‍यास जोरदार झटका दिला. या प्रकरणी ग्राहक न्यायमंचाने तडजोड करून शेतकर्‍याकडून त्यापैकी ३१ हजार रुपये वसूल करण्यास मनाई केली. बेताल महावितरणला ..

मोघेंचे ४२ लाख रुपयांचे ४२० चे प्रकरण!

आश्रमशाळा आणि डीएड कॉलेजसाठी घेतले पैसे तभा वृत्तसेवा यवतमाळ, ८ एप्रिल आदिवासी आश्रमशाळा व मराठी डीएड महाविद्यालयाला सरकारकडून मान्यता मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४२ लाख घेऊन कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रलंबित ..

वेकोलि प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा नवीन मोबदला

खा. अहिरांमुळे कायद्यात दुरुस्ती तभा वृत्तसेवा वणी, ८ एप्रिल यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव व झरी तालुके हे नैसर्गिक संपत्तीने संपन्न आहेत. या परिसरातील खनिज संपत्ती असलेल्या जमिनी कवडीमोलाने शेतकर्‍यांपासून घेणे सुरू होते. त्याविरुद्ध प्रकल्पग्रस..

सखी ब्राह्मण महिला मंडळाची ‘चैत्र स्वर संध्या’

तभा वृत्तसेवा यवतमाळ, ८ एप्रिल नूतन संवत्सराच्या पहिल्या दिवशी सखी ब्राह्मण महिला मंडळातर्फे ‘चैत्र स्वर संध्या’ हा बहारदार कार्यक़्रम पाटबंधारे सांस्कृतिक येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यवतमाळ अर्बन बँकेचे मुख्याधिकारी ..

आज यवतमाळात दुचाकी महारॅली

तभा वृत्तसेवा यवतमाळ, ४ एप्रिल येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी मतदार जागृती अभियान भव्य स्वरूपात राबविण्यात येत आहे. शनिवार, ५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून दुचाकी महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ ..

देशाला एक माणूस बदलवू शकत नाही

तभा वृत्तसेवा यवतमाळ, ४ एप्रिल या देशाला एक माणूस बदलवू शकत नाही. गरीब, सामान्य, महिला या देशाला बदलतील. या सर्वांना आम्ही शक्ती देऊ. देश या सर्वांचा आहे. कोणा एकाचा नाही, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. सध्या दिवसेंदिवस ..

मनीषा केतकर राज्यातून द्वितीय

शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा तभा वृत्तसेवा यवतमाळ, ३ एप्रिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद दरवर्षी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करीत असते. या स्पर्धेत जिल्हाभरातून, विस्तार सेवा केंद्रामार्फत उपक्रमशील ..

कापूस उत्पादकांना ‘मार्च’चा फटका

तभा वृत्तसेवा वणी, २ एप्रिल मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा असतो. या महिन्याचा आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम होतो. यावर्षी तर कापूस उत्पादक शेतकर्‍यांनाही या मार्च एन्डिंगचा चांगलाच फटका बसत आहे. व्यापार्‍यांनी गेल्या पंधरा दिवसांत ..

वणीच्या प्रदूषणावर उपाययोजनाच नाही

तभा वृत्तसेवा वणी, ३ एप्रिल वणी तालुक्यातील खनिजांच्या खाणींमुळे परिसरात सातत्याने प्रदूषणात वाढ होत असूनही प्रभावी उपायोजना झाल्याचे दिसत नाही. जिल्हाधिकार्‍यांनी मागीलवर्षी प्रदूषणावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याचे सूतोवाच केल्याने जनतेच्या ..

मराठा आरक्षण सर्वेक्षणात अनेक विसंगती

  मराठा समाजात नाराजीचा सूर   धनंजय कुदे   उमरखेड, २ एप्रिल   फुटिरतेची बीजे रोवून समाजात दुही निर्माण करण्यास कारणीभूत ठरणार्‍या ‘मराठा आरक्षण’ या नावाने सुरू असणार्‍या सर्वेक्षणाविरुद्ध सर्वत्र असंतोष ..

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

  तभा वृत्तसेवा   यवतमाळ, २ एप्रिल   राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामाफत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार २०१३ या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्यास ..

अचानक कामे बंद करण्याचे आदेश

  तभा वृत्तसेवा नेर, २ एप्रिल नेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व पंचायत विस्तार अधिकार्‍यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करीत जारी केलेल्या ‘अघोषित’ आदेशामुळे तालुक्यात विकास कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वीच ..

दीडलाख माळी मतदार लावणार लोकसभेचा निकाल

माळी महासंघाच्या नेर येथील सभेत विश्‍वास तभा वृत्तसेवा नेर, २ एप्रिल यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ हा माळी समाजाच्या राजकीय दृष्टीने अती महत्वाचा असून या मतदारसंघाच्या रचनेत माळीबहुल तालुक्यांचा समावेश असल्याने एकंदर माळ्यांचे मतदान निर्णायक ..

नवीन मतदार कोणासाठी

तभा वृत्तसेवा ढाणकी, १ एप्रिल लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मतदार नोंदणीबाबत शासनाने विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांची नावे नोंदविली आहेत. हे नवीन मतदार कोणाचे भाग्यविधाते ठरतील हे येत्या निवडणुकीच्या मतमोजणीतच आता कळणार आहे. गाव, ..

शिवसेनेचा ‘बुलेट राजा’ दिग्रसच्या रस्त्यांवर

आ. संजय राठोड यांची बुलेट प्रचार फेरी तभा वृत्तसेवा दिग्रस, ३१ मार्च हिंदू नूतन वर्षाच्या आरंभदिनी, सोमवार, ३१ मार्च रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी ‘बुलेट’ दुचाकी चालवीत शेकडो दुचाकीस्वार कार्यकर्त्यांसोबत ..

जबरी चोरीतील आरोपी देवानंद पवारला अटक करा

अयनुद्दीन सोलंकी यांची पोलिस महासंचालकांकडे मागणी जिप सदस्य देवानंद पवार शिवाजीराव मोघेंचा हस्तक तभा वृत्तसेवा यवतमाळ, ३० मार्च सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा अत्यंत निकटचा हस्तक, माजी स्वीय सहायक व जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवारविरुद्ध ..

सहा महिन्यांपासून मजुरीसाठी वणवण

शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविणारे मरसूळ येथील मजूर. तभा वृत्तसेवा उमरखेड, ३१ मार्च हाताला काम मिळावे, यासाठी तालुक्यातील मरसूळ येथील मजुरांनी उपोषण करून काम मागितले. त्यानंतर तहसील प्रशासनाने पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्‍यांना सांगून ..

भाजपा बूथ कार्यकर्ता मेळावा

तभा वृत्तसेवा यवतमाळ, ३१ मार्च यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई (आ) महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ नियोजन व प्रचार यंत्रणा राबविण्याकरिता विधानसभा यवतमाळ भारतीय जनता पार्टीच्या बुथ लेव्हल कार्यकर्त्य..

आसोल्यात आणखी एका बिबटाचा मृत्यू

तभा वृत्तसेवा यवतमाळ, २८ मार्च यवतमाळ वन परिक्षेत्रातर्ंगत वाघापूर रेंजमधील आसोला जंगलात बिबट मृतावस्थेत आढळून आला. या बिबट्याचा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी या घटनेची माहिती नेर वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाली होती. ..

विदर्भवादी कार्यकर्ते ‘स्वतंत्र’

तभा वृत्तसेवा वणी, २८ मार्च येथील गौरक्षण सभागृहात झालेल्या विदर्भवादी कृती समितीच्या बैठकीत समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी ‘स्वतंत्र’ ठेवण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मंगल ..

शिक्षण विभागाची कारवाई रखडली

तभा वृत्तसेवा वणी, २८ मार्च तालुक्यातील परसोडा येथील मुख्याध्यापक, पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुखावर शिस्तभंग व निलंबनाची कारवाई रखडल्याने आता स्वत: उपसभापती वृषाली खानझोडे यांनीच शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. ..

यवतमाळ-वाशीम लोकसभेसाठी २६ उमेदवार रिंगणात

   १४ जणांची माघार, अपक्षांना चिन्ह वाटप  तभा वृत्तसेवा  यवतमाळ, २६ मार्च  यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता या निवडणुकीत ..

प्रस्थापितांच्या विरोधात आपली उमेदवारी : मोहन राठोड

  तभा वृत्तसेवा   यवतमाळ, २६ मार्च   राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपलीच मक्तेदारी असल्यागत वावरणार्‍या प्रस्थापितांच्या विरोधात आपली उमेदवारी असून समाजामध्ये आपण परिवर्तन घडवून आणू, असा दांडगा विश्‍वास यवतमाळ-वाशीम ..

‘कॉपीमुक्त’ अभियानामुळे परीक्षा केंद्र पडली ओस

 तभा वृत्तसेवा  ढाणकी, २६ मार्च  तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कॉपीमुक्त अभियानाला आता ग्रामीण भागातूनसुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी परीक्षा केंद्राला आलेले जत्रेचे स्वरूप नष्ट होऊन केवळ परीक्षार्थ्यांव्यतिरिक..

तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या अद्याप कायमच

  तभा वृत्तसेवा   यवतमाळ, २६ मार्च   जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या राज्य स्तरावरील प्रलंबित विविध समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षक आमदार कपिल पाटील यांना दिलेल्या ..