तासाभराची झोप वाढवेल तुमची स्मरणशक्ती

0
198

वृत्तसंस्था
टोकियो, १० जानेवारी
दुपारच्या जेवणानंतर घेतलेली तासाभराची झोप वरिष्ठ नागरिकांमध्ये स्मरणशक्ती वाढवून, स्पष्टपणे विचार करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यास मदत करते, असे एका संशोधनाअंती दिसून आले आहे.
वरिष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यात झोपेची महत्त्वाची भूमिका आहे. दुपारी घेतलेल्या झोपेचे ज्येष्ठ नागरिकांवर काय परिणाम होतात हे तपासण्यासाठी ६५ तीन हजारांपेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला.
संशोधनात असे दिसून आले की ६० टक्के ज्येष्ठ नागरिक दुपारच्या जेवणानंतर झोप घेतात. त्यांच्या झोपेची वेळ ३० मिनिटे ते ९० मिनिटे इतकी होती. बहुतांश लोक ६० मिनिटे झोप घेताना आढळले.
या संशोधनाच्या परिणामांमध्ये असे दिसून आले की, जेवणानंतर तासाभराची झोप घेणार्‍यांचे आरोग्य झोप न घेणार्‍यांच्या तुलनेत जास्त चांगले होते. याउलट झोप न घेणार्‍यांची मानसिक क्षमता चार ते सहा टक्क्यांनी कमी होती.