विरोधभक्ती!

0
125

दूरदर्शनवर, कोणत्याही न्यूज चॅनेलवर क्लिक केले, तर गेल्या काही दिवसांपासून तीन-चार चेहरे प्रामुख्याने दिसतात. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, मायावती, लालूप्रसाद यादव, ओवैसी… इत्यादी नेते अधूनमधून पंतप्रधान मोदींविरुद्ध आक्रोश करताना दिसतात. त्यांच्या वागण्यावरून दिसते की, या सर्वांना मोदींची विरोधभक्ती लागलेली आहे! भक्तिशास्त्रातील नवभक्ती आपल्या सर्वांना माहीत आहे. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा नऊ प्रकारच्या भक्तीचे ज्ञान सर्वसामान्यांना असेल. परंतु, याशिवाय आणखी एक भक्ती आहे- ती ‘विरोधभक्ती’ म्हणून भक्तिशास्त्रात प्रसिद्ध आहे.
लंकाधिपती रावणाचा प्रत्येक श्‍वास प्रभू रामचंद्रांच्या विरोधासाठीच होता ना! त्यासाठी संपूर्ण सोेन्याची लंका युद्धात झोकली. परिणाम सर्वश्रुत आहे. द्वापरयुगात अधर्माच्या रक्षकांनी आपल्याच बहिणीच्या म्हणजे देवकीच्या पुत्राच्या सर्वनाशाकरिता विरोधभक्तीत स्वतःचे सर्वस्व पणाला लावले. भगवान यदुनाथाने नीती, सदाचार याच्याच जोरावर एकेका राक्षसाला कंठस्नान घालून शेवटी दृष्ट कंसाचाही वध केला. विरोधभक्तीचे हे ज्वलंत उदाहरण होय! आपल्या देशात अडीच वर्षांनंतर एक सुशासन आले असताना, देश सतत प्रगतीच्या उंबरठ्यावर वाटचाल करत असताना, विपक्षांचा एकच ध्यास दररोज कुठल्याही कारणास्तव पाहायला मिळतो. काळ्या पैशाबाबत मोदी सरकार काहीच करत नाही म्हणून हेच विरोधक सतत आक्रोश करत होते. पहिली दोन वर्षं यावर ठोस निर्णय झाला नाही. कारण अन्य क्षेत्रातील स्थिरता, जागातील भारताची प्रतिष्ठा, शेजारच्या राष्ट्रांशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न वगैरे विषयांवर लक्ष होते. हे सगळं करता करता भ्रष्टाचार व काळ्या पैशावर नोटबंदीचा निर्णय सरकारने घेतला.
या निर्णयवर अंमलबजावणी झाल्यानंतर जनतेला त्रास झाला हे खरे, परंतु ८० टक्के जनतेने याचे स्वागतसुद्धा केले. एटीएमच्या रांगेत हेच विरोधक जाऊन लोकांना भडकवत होते. आपली प्रसारमाध्यमे सारखे एटीएमच्या रांगा दाखवत होते. परंतु त्या बँका किंवा एटीएम दाखवत नव्हते जिथे गर्दी नव्हती! एवढ्या मोठ्या १२५ कोटी जनता असलेल्या देशात एकाएकी सर्वत्र सुरळीत कारभार कसा चालणार? निर्णयाची अंमलबजावणी केल्यानंतर सर्व नियमित होण्याकरिता मोदींनी जनतेला ५० दिवस मागितले. सर्व जनता सरकारच्या या नोटबंदीच्या निर्णयाला सहकार्य करत असताना मात्र विरोधकांच्या पोटात दुखणे साहजिकच होते. ‘‘लोगों को तकलीफ हो रही हैं, इन्होंने तयारी नही की, इनकी योजना फेल हैं. मोदीजी ने जनता के साथ खिलवाड किया…’’ वगैरे. या नेत्यांचा व प्रसारमाध्यमांचा आक्रोश दररोज दूरदर्शनवर दिसत आहे. मोदींची चूक हे एकच ध्येय!
परंतु, या मीडियाला किंवा तथाकथित नेत्यांना आपल्याच देशातील पश्‍चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणाची दखल घेता येत नाही. स्थानिक मुसलमानांकडून होत असलेल्या अत्याचाराची व सार्वजनिक संपत्तीची तोडफोड कुठल्याच मीडियाने प्रसिद्ध केली नाही. फेसबुकवर गेल्या चार-पाच दिवसांपासून छायाचित्रे पाहायला मिळत आहे. हिंदूंची घरे जाळणे, स्त्रियांना मारहाण, हत्या, लूट अशी छायाचित्रे फेसबुकवर पाहायला मिळाली. परंतु, आपल्या मीडिया ते दिसत नाही. मोदींविरुद्ध ओरडणार्‍या ममता बॅनर्जी यांना हे दिसत नाही काय?
‘‘हमने १००० साल हिंदुस्थानपर राज किया हैं. अब हम बहुसंख्यक हो गये हैं. इस्लाम जिंदाबाद!’’ असे म्हणून हिंदूंची हत्या हेच ध्येय आपल्याच देशात वेगवेगळ्या ठिकाणी मिनी पाकिस्तान म्हणून निर्मित होत असताना, विरोधक या विषयी गंभीर नाहीत, ही मोठी चिंतेची बाब आहे. मुस्लिम मतांसाठी वाट्‌टेल ते लाड पुरवणे, हेच कॉंग्रेसने केले आहे! नोटबंदीमुळे काश्मीरमध्ये बराच फरक पडला. तेथील जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. नोटबंदीचा झटका पाकिस्तानला बसला आहे, हे आमच्या विरोधकांना दिसत नाही! दिसते फक्त एकच- ‘मोदीविरोध!’ वा रे यांची विरोधभक्ती!
नरेश काशीनाथ पांडे,९४२१७१९४१७