आयएसआयची नवी रणनीती

0
146

राष्ट्ररक्षा
देशवासीयांना शत्रूवर नजर ठेवण्याची गरज

आंध्र प्रदेशमधील कुनेरूजवळ जगदलपूर भुवनेश्‍वर हिराखंड एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने २६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. कुनेरु हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात आहे का, हे तपासण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघातात वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये कानपूरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात १४० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये सियालदाह अजमेर एक्सप्रेसला अपघात झाला होता. यातील कानपूरमधील रेल्वे अपघातामागे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याची बिहार पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
भारतविरोधी कारवाई वाढण्याची शक्यता
भारतीय सैन्याने मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार्‍या झकीर उर रहमान लख्वीच्या पुतण्याला गुरुवारी काश्मीरमधील बांदीपूर इथे कंठस्नान घातले. नवशेरा इथे झालेल्या हल्ल्यात या पुतण्याचा मुख्य सहभाग होता. अबु मुसाहिब हा दहशतवादी झकीर उर रहमान लख्वीच्या संपर्कात असायचा आणि भारतामध्ये अनेक दहशतवादी हल्ले करण्याचा कट या दोघांनी रचला होता. पाकिस्तानमध्ये नवे लष्करप्रमुख जावेद बाजबा यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. आणि त्यांनी आयएसआयच्या जुन्या प्रमुखांची हकालपट्टी केली आहे. त्यांनी आपल्या मर्जीतल्या लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार यांना नियुक्त केले आहे. मुख्तार यांना गुप्तहेर खात्याच्या कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे येत्या काळात भारतविरोधी कारवाई वाढण्याची शक्यता अधिक आहे.
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी कानपूर येथील दुर्घटना घडवल्याचे कबुली बिहार पोलिसांच्या ताब्यातील आरोपींनी दिला आहे. इंदौर-पाटणा एक्सप्रेस आणि सियालदा अजमेर एक्सप्रेस या दोन रेल्वेच्या अपघातात उमाकांत पटेल, मोतीलाल पास्वान, मुकेश यादव हे संशयित आरोपी आहे. या तिघांवरही रेल्वे रुळावर कुकर बॉम्ब ठेवल्याचा संशय आहे. रुळावरून घसरून रेल्वेचा अपघात झाला होता.
भारत-नेपाळ सीमा धोकादायक
यापूर्वी नेपाळ पोलिसांनी आयएसआयचा हँडलर ब्रिज किशोर गिरी, मुजाहिर अन्सारी यालाही ताब्यात घेतले. यावरून नेपाळ सीमा किती धोकादायक आहे याची गंभीरता आपल्याला समजून येईल. आत्तापर्यंत काश्मीरच्या सीमारेषेवरून जितके दहशतवादी आत आले नसतील तेवढे दहशतवादी नेपाळ सीमेवरून घुसखोरी करत आहेत. कानपूरमधील रेल्वे अपघात पूर्वनियोजित कटाचा भाग होता. या अपघाताशी गुप्तहेर संस्था आयएसआय म्हणजे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ही संबंधित आहे, असे स्पष्ट झाले आहे. या सर्व घटनाक्रमात शमशुल शुदा आघाडीवर होता. तो नेपाळमधील आपल्या एजंटच्या मार्फत बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढत होता. पैशाचे आमिष दाखवून दहशतवादी कृत्य करण्यास प्रवृत्त केले जायचे. याच पद्धतीने नेपाळमधून दोन आणि भारतातून ३ जणांना या कटात सामील केले होते. भारत नेपाळ सीमा धोकादायक बनली आहे. भारत-बांगलादेश आणि भारत-नेपाळ सीमेवरील मदरशांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. मदरशांचा वापर उग्रवादाचा प्रसार करण्याकरता केला जातो. सीमा सुरक्षा बल या सीमेवर तैनात आहे. त्यांना घुसखोरी थांबवण्यात अपयश आले आहे. सीमा सुरक्षा बलाने नेपाळच्या आत जाउन हस्तकांना पकडले पाहिजे.
भारतविरोधी कारवायांची माहिती
नेपाळ सरकारने तपासाची माहिती भारतीय पोलिसांना दिली आहे. भारताच्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन आणि रॉ यांचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत. मुख्य आरोपी दुबईत पळून गेला आहे. त्याला नेपाळ सरकारच्या मदतीने भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका अंदाजाप्रमाणे भारतात २०० ते २५० दहशतवादी सेल असावेत, ज्यांना विविध प्रकारची दहशतवादी कृत्ये करण्यास प्रवृत्त केले जाते. प्रत्येक वर्षी अशा प्रकारच्या २० ते २५ अशा प्रकारच्या सेलचा छडा लावून बरबाद केले जाते, असे सरकारी आकडा सांगतो. (हींींि://ुुु.ीरींि.ेीस/ीरींिेीसींि/र्लेीपींीळशी/ळपवळर/ींळाशश्रळपश/ळपवशु.हींाश्र या दुव्यावर माहिती उपलब्ध आहे) मात्र, त्यांच्या जागी अजून नवीन सेल तयार केले जातात. या प्रत्येक सेलमध्ये पाच ते दहा दहशतवादी प्रवृत्तीचे युवक असू शकतात. मग ते आयएसआयच्या इशार्‍यावरुन विविध दहशतवादी कारवाया करत असतात.
२०१६ मध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ५२ भारतीय आयसिस दहशतवाद्यांना अटक केली. त्यातील १२ महाराष्ट्र, १० केरळ, १० तेलंगणा, कर्नाटक, ४ उत्तर प्रदेश आणि पाच पश्‍चिम बंगाल इत्यादी ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, दिल्ली इथून एक एक दहशतवाद्यांना अटक केली गेली. बहुतेक अटक झालेले दहशतवादी हे २५-३५ वर्षांचे आहेत. या बहुतेकांवर जहाल विचारसरणीचा परिणाम झालेला होता. बहुतेक हे सुशिक्षित आणि चांगल्या आर्थिक पार्श्‍वभूमी असलेल्या घरातून आलेले आहेत. यापूर्वी फक्त गरीब युवकच दहशतवादात सामील होत होते. आता मात्र इंटरनेटच्या जाळ्यातून फसलेले मध्यमवर्गीय अनेक युवक दहशतवादी संघटनेत सामील होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मधील ५०% हे अल हेदीत, ३० % तब्लगी आणि २० % देओबंदी विचारसरणीचे आहेत. त्यातील ८५ टक्के हे सुन्नी आहेत, तर १५ टक्के हे इतर धर्मांतून इस्लाममध्ये धर्मांतरित झालेले आहेत. यावरून आयएसआय आणि आयसिस या दोन्ही संघटनांचा किती खोलवर प्रभाव पडला आहे याचा अंदाज येतो. पकडलेले गेलेले युवक हे हिमनगाचे टोक आहेत. त्याव्यतिरिक्त अनेक तरुण देशात काम करत असतील. आपण ज्या वेळी देशाच्या सुरक्षेविषयी बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर देशाची सीमा आणि तिथे तैनात असणारे सैनिक हेच पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात. मात्र, १९७१ चे युद्ध हरल्यानंतर आयएसआय ने भारतात दहशतवाद पसरवला आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारे आयएसआय भारताविरुद्ध युद्ध लढत आहे.
युद्धाची रणनीती काय
राष्ट्राची संपत्ती तीन मोठ्या भागात विभागली जाऊ शकते. पहिले राष्ट्रांविषयी गुप्त माहिती (डशर्लीीळींू ेष खपषेीारींळेप) शत्रूपर्यंत पोहोचायला नको. जसे- संरक्षणसिद्धता, आपल्याकडे असलेली शस्त्रे. दुसरे राष्ट्राची जनता. काही आपल्या नागरिकांना दुष्कृत्य करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. ज्याला सबव्हर्जन (र्डीर्लींशीीळेप) म्हटले जाते. तिसरा धोका म्हणजे राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान ज्याला सॅबोटाज (डरलेींरसश) असे म्हटले जाते. १९७२ सालापासून अशा प्रकारचा धोका वाढला आहे याच धोक्यापासून आपल्याला संरक्षण करायचे आहे.
इतिहासात डोकावल्यास, चाणक्यासारख्या विचारवंताने म्हटले होते, गुप्तहेर वार्ता एकत्र करणे हे राजाचे महत्त्वाचे काम असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या हेरगिरीच्या कथा प्रसिद्ध आहेत. स्वतः महाराजही शत्रूंच्या प्रदेशात माहिती काढण्यासाठी जायचे. भारताला आयएसआय आणि देशांतर्गत दहशतवादी संघटना काश्मिरातील लष्करे तैयब्बा, हिज्बुल मुजाहिदीन, जैशे महम्मद, तसेच इतर सिम्मी, इंडियन मुजाहिदीन या गटांपासून आपल्याला धोका आहे. पाकिस्तान या गटांचा वापर भारताविरोधी करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारचे नुकसान केल्यास भारत काश्मीरबाबत तडजोड करण्यास राजी होईल, असे त्यांना वाटते.
नागपूरजवळच्या पुलगाव इथल्या दारुगोळा कारखान्यात आग लागली होती. तिथे १० हजार कोटीहून अधिक किमतीचा दारुगोळा खाक झाला होता. हा एक घातपात आयएसआयच्या हस्तकांनी घडवून आणला असावा. यापूर्वी दारुगोळा कारखान्यात लागलेल्या आगीचे कारण घातपात हे होते. आज आयएसआयने आपल्या देशातील कॅण्टोन्मेंट किंवा मोठ्या शस्त्र बनवणार्‍या फॅक्टरीच्या आसपास आपल्या हस्तकांना बसवले आहे. आपल्या गुप्तचर यंत्रणा/सुरक्षा यंत्रणा ढिल्या झाल्या की आत प्रवेश करून मोठी घातपाताची काम ते करतात. त्यामुळे भारताला आपला आयएसआयपासून बचाव करावा लागेल.
आयएसआयचे डावपेच
लष्करी छावण्यांच्या आसपास आयएसआय आपले प्रतिनिधी तयार करते. आय. एस. आय. ने भारतात स्फोटके प्राप्त करण्याचे वा तयार करण्याचे सामर्थ्य विकसित केलेले आहे. लष्करी उपकरणाचे केवळ अत्यावश्यक लहान घटकच तस्करीचे मार्गाने आणले जातात. आयएसआयने गुन्हेगारी जगत आणि फुटीर चळवळींसोबत आपल्या कारवाया एकसंध करून घेतल्या आहेत. आय. एस. आय. भारतातील दहशतवादी कारवायांचे संपूर्ण सहसंयोजन (कोऑर्डिनेशन) करत आहे. आय. एस. आय. नावाचा राक्षस नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो काय? राजकीय इच्छाशक्ती असल्यास आणि मतपेटीचे राजकारण दूर ठेवल्यास त्याला ताळ्यावर आणणे शक्य आहे.
काय करावे
तीन पातळींवर हा बचाव करावा लागेल. राष्ट्राची गुप्त माहिती सुरक्षितच ठेवावी लागेल. त्यासाठी सायबर सुरक्षा, दूरध्वनीवरील संभाषण शत्रूच्या कानी पडू नये म्हणून प्रयत्न, कॉम्प्युटरवरील माहितीचे संरक्षण, विविध सरकारी कार्यालयांतील महत्त्वाच्या कागदपत्राचे संरक्षण करावे लागेल. कोणी देशद्रोही नागरिक जर ही माहिती विकायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला पकडावे लागेल.
याशिवाय सबव्हर्शन म्हणजे युवकांचे मनपरिवर्तन करून त्यांना दहशतवादी कृत्य करण्यास भाग पाडणे. अशा युवकांवरही लक्ष ठेवावे लागेल. कुठलाही युवक जिहादी किंवा अति डाव्या विचारसरणीचा प्रभावाखाली येत असेल किंवा दहशतवादी संघटनेत सामील होत असेल किंवा अशा प्रकारचे कृत्य करण्यास प्रवृत्त होत असेल तर त्याला थांबवावे लागेल. मात्र, पूर्ण देशावरती लक्ष ठेवणे कोणत्याही गुप्तचर यंत्रणेला शक्य नाही त्यामुळे सामान्य जनतेने आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे यावर नजर ठेवणे गरजेचे आहे आणि कुठलाही युवक अशा विचारसरणीकडे ओढला जात असेल तर त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना देणे महत्त्वाचे आहे.
एक मोठा धोका राष्ट्रीय मालमत्तेच्या नासधुसीचा आहे. अगदी बसस्टँड असो की रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे कोणतीही संघटना किंवा युवक ही संपत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ही माहिती सुरक्षा एजन्सीला देणे आवश्यक आहे.
थोडक्यात पाकिस्तानने आपल्याविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा आणखीन एक नवा प्रकार नेपाळमध्ये पकडलेल्या आयएसआय एजंटकडून समोर आलेला आहे. म्हणून याकरिता सर्व देशाने देशविघातक तत्त्वांच्या विरोधात एकत्र येणे गरजेचे आहे. आपले खरे शत्रू चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, डावे दहशतवादी, जहाल, नक्षलवादी, जिहादी दहशतवादी आणि भारतविरोधी संस्था आणि भारतविरोधी नागरिक आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवले पाहिजे. सर्व देश एकत्र आल्यास आपण देशासमोरील बहुआयामी धोक्यांना उत्तर देण्यास समर्थ होऊ शकतो. आपसातील मतभेद कमी करून देशवासीयांनी शत्रूवर नजर ठेवण्यास देशातील नागरिकांनी मदत करावी.
आयएसआय हजार जखमांनी भारतास रक्तबंबाळ करत आहे. सरकारे येतील आणि जातील पण पण आय. एस. आय. तिची व्यूहनीती कधीच बदलत नाही.

• ब्रिगेडियर हेमंत महाजन/९०९६७०१२५३