बाभुळगाव तालुक्यातही वायपीएस

• १ हजार ३४२ जणांनी केले मतदान, ६७ मतांनी विजयी

0
125

•नांदुरा जिप शाळेच्या मुख्याध्यापकास अटक
•पाच मुलींच्या शारीरिक शोषणाबद्दल तक्रार
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, ११ फेब्रुवारी
काही महिन्यांपासून शाळेतील विद्यार्थिनींचे शिक्षकांकडूनच शारीरिक शोषण होण्याच्या घटना यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. यवतमाळच्या वायपीएस या ख्यातनाम शाळेतून सुरू झालेल्या या प्रकाराचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. बाभुळगाव तालुक्यातील एका दोन शिक्षकी शाळेतील मुख्याध्यापक असलेल्या शिक्षकाला पोलिसांनी याच कारणासाठी अटक केल्यामुळे पुन्हा जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
बाभुळगाव पोलिस ठाण्यांतर्गत नांदुरा (खुर्द) येथील जिल्हा परिषद शाळेत दोनच शिक्षक असून त्यातील एक मुख्याध्यापक आहे. यवतमाळ शहरात राहणारा रमेश तुमाने नावाचा हा मुख्याध्यापक आमच्या मुलींसोबत शारीरिक चाळे करतो, अशी तक्रार पालकांनी केली. या तक्रारींवरून पोलिसांनी या जिल्हा परिषद शाळेवर धाड टाकून मुख्याध्यापक रमेश तुमाने याला अटक केली.
हा मुख्याध्यापक शाळेतील मुलींना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्याशी शारीरिक चाळे करतो, अशी तक्रार पाच अल्पवयीन मुलींनी केली आहे. वयोगट ६ ते १२ यातील या पाच मुलींनी आपल्या पालकांसह पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. विशेष म्हणजे, यापैकी चार मुली या शाळेत शिकत आहेत. एक मुलगी तर एक वर्षापूर्वी या शाळेची विद्यार्थिनी होती, तिनेही हिंमत दाखवून वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकाराची तक्रार नोंदवली आहे.
या शाळेत शिकणार्‍या एका मुलीकडून या शारीरिक अत्याचाराच्या घटनेचे रहस्य उलगडले. या मुलीला त्रास होत असल्याचे आईवडिलांच्या लक्षात आले. यापूर्वीही काही मुलींसोबत असाच प्रकार घडल्याने गावातील नागरिक व पालक घटनेच्या मुळापर्यंत गेले असता आरोपी रमेश तुमाने शाळेतील अनेक चिमुकलींवर शारीरिक अत्याचार करीत असल्याचे उघडकीस आले.
यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष तुमाने आणि बाभुळगावचे ठाणेदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात महिला पोलिसांचा समावेश असलेल्या चमूने पाचही विद्यार्थिनींच्या तक्रारी नोंदवून मुख्याध्यापक रमेश तुमाने याच्यावर पाच वेगवेगळे गुन्हे नोंदवून अटक केली आहे.