कॅन्सरमुक्तीच्या लढ्यामध्ये आशेची नवी किरणे

0
196

आाधुनिक रोगचिकित्सा शास्त्राने आणि औषधांनी अनेक असाध्य रोगांवर विजय मिळविलेला आहे आणि काहींना अटकाव केलेला आहे; परंतु प्राणघातक कॅन्सर अजूनही सर्वच रोगोपचार पद्धतींना चकवून पुढे जाण्यामध्ये यशस्वी होत आहे. मागील २० वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दुप्पट झालेली आहे. भारतामध्ये कॅन्सर हा दुसरा सर्वात मोठा जीवघेणा आजार आहे, जो प्रत्येक वर्षी ११ टक्के दराने वाढत आहे. २००१ या वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचे सुमारे ८ लाख रुग्ण होते, आता हीच संख्य २५ लाखांच्या वर पोहोचलेली आहे. दरवर्षी जवळपास ५ लाख लोक कॅन्सरने मृत्युमुखी पडतात. शरीरामध्ये विषवल्लीसारखा वेगात पसरणारा हा आजार वाढतच आहे, त्याच वेळी कॅन्सरविरोधात लढण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी विविध चिकित्सालयीन उपायदेखील शोधले जात आहेत. भारतासह दहा देशांचे वैज्ञानिक वेगवेगळ्या टीम बनवून कॅन्सरच्या जनुकांचे रहस्य जाणून घेण्याचे काम करीत आहेत. या शृंखलेमध्ये ब्रिटिश टीम स्तन कॅन्सरच्या, जपानी टीम लिव्हर कॅन्सरच्या आणि भारतीय टीम तोंडाच्या कॅन्सरच्या जनुकांचा कॅटलॉग बनविण्याचे काम करीत आहे. याशिवाय चिनी वैज्ञानिक पोटाच्या तर अमेरिका वैज्ञानिक हे मस्तिष्क, गर्भाशय आणि स्वादुपिंड यांच्या कॅन्सरच्या जनुकांचा डीकोड करीत आहे. या वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, कॅन्सरच्या जनुकांचा संपूर्ण कॅटलॉग तयार करण्यासाठी आणखी किमान ५ वर्षे लागतील. आतापर्यंत ब्रिटिश वैज्ञानिकांनी कॅन्सरच्या दोन धोकादायक प्रकारांचा- त्वचेच्या आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरचा जनुकीय कोड तोडण्यामध्ये यश मिळविले आहे. या शोधाला कॅन्सरशी लढण्याच्या दिशेमधले एक क्रांतिकारी यश मानले जात आहे.
अमेरिकी वैज्ञानिकांच्या मते जर कॅन्सर रुग्णाच्या पांढर्‍या रक्तपेशी काढल्या आणि त्यांच्यामध्ये जनुकीय बदल करून त्या रुग्णाच्या शरीरामध्ये टाकल्या, तर केवळ कॅन्सरवर उपचार करणे शक्य होणार नाही, तर कॅन्सरची पुनरावृत्तीदेखील टाळता येऊ शकेल. वॉशिंग्टनच्या फेड हर्चिसन कॅन्सर संशोधन केंद्रामध्ये अशा प्रकारच्या प्रयोगाचे प्रमुख असलेल्या स्टेनली रिडेल यांचे म्हणणे आहे की, त्यांनी ही पद्धत अशा रुग्णांवर करून पाहिली ज्यांचे जीवन तीन ते पाच महिन्यांपेक्षा अधिक उरलेले नव्हते. त्यांच्यासाठी सर्व आशा संपुष्टात आल्या होत्या. आम्ही त्यांच्यामधल्या अनेकांना वाचवू शकलो आणि ते चांगल्या प्रकारे आपले जीवन जगत आहेत. वॉशिंग्टनमध्ये असोशिएट फॉर दी ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्समध्ये या प्रकारच्या प्रयोगासंबंधित दोन पेपर सादर करण्यात आले. या संमेलनाला जगातील सर्वात मोठे विज्ञान संमेलन मानले जाते. यामध्ये प्रो. वियरा बोनिनी यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या जनुकीय बदलाचा परिणाम जवळपास आयुष्यभर राहू शकतो. यामध्ये कॅन्सर पुन्हा परतण्याचा धोकादेखील जात असावा. त्यांनी दहा कॅन्सर रुग्णांवर हा प्रयोग करून पाहिला. डॉ. रिडेल यांच्यानुसार- ‘‘ल्युकेमियाच्या रुग्णांवर हा प्रयोग ९४ टक्क्यांपर्यंत यशस्वी झाला. तसेच इतर प्रकारच्या ब्लड कॅन्सरच्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रोगमुक्त झालेले आहेत. रुग्णांच्या बाबतीत तर खूप चांगले परिणाम मिळाले आहेत; परंतु हे सांगणे कठीण आहे की, याचा प्रभाव किती दिवस राहील.’’
वैज्ञानिकांनी या पद्धतीला ‘इम्युनोथेरपी’ असे नाव दिले आहे. पांढर्‍या रक्तपेशी या सामान्यत: बॅक्टेरियांशी आणि व्हायरसशी लढतात. या पेशींना रुग्णाच्या शरीरातून काढले जाते. प्रयोगशाळेत त्यांच्यामध्ये काही बदल केले जातात, जेणेकरून त्या पेशी कॅन्सरची ओळख करू शकतील. अशा लाखो पेशी बनविल्या जातात. नंतर त्यांना पुन्हा शरीरामध्ये टाकले जाते. अशा प्रकारच्या उपचारामध्ये केमोथेरपीची आवश्यकता नसते. आतापर्यंत ल्युकेमियाच्या आणि इतर ‘लिक्विड कॅन्सर’च्या रुग्णांवरच हे प्रयोग झालेले आहेत. प्रोस्टेन, स्तन किंवा इतर ट्युमरवर हा प्रयोग करण्यात आलेला नाही. या पद्धतीच्या ‘साईड इफेक्ट’वरही जास्त काम झालेले नाही. हा प्रयोग अनेक देशांमध्ये केला जात आहे आणि रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पैसेदेखील खर्च करावे लागत आहेत; परंतु मिलान विश्‍वविद्यालयाच्या प्रो. वियरा बोनिनी यांचे म्हणणे आहे की, आता यावर आणखी काम करण्याची गरज आहे. हे अशा व्हॅक्सिनसारखे आहे जे जीवन वाचवते.
कॅन्सरशी लढाई करण्यामध्ये भारतीय वैज्ञानिकांना मोठे यश मिळालेले आहे. डीएस रिसर्च सेंेटर कोलकाताच्या वैज्ञानिकांनी खाद्यपदार्थाच्या पोेषण ऊर्जेने अशा औषधाची निर्मिती केली आहे, जी कॅन्सर पेशींना अटकाव करून त्यांचे उच्चाटन करण्यासाठी सक्षम आहे. वैज्ञानिक परीक्षणांमध्येही या औषधाचे निकाल अधिक चांगले असल्याचे दिसून आले आहे. कोलकाताच्या जाधवपूर विश्‍वविद्यालयाच्या वैज्ञानिक संशोधन केंद्राचे (सीआरसीचे) संचालक डॉ. टी. के. चॅटर्जी यांच्या म्हणण्यानुसार ‘पोषण ऊर्जेसह तयार करण्यात आलेल्या, डीएस रिसर्च सेंेटरच्या सर्वपिष्टी या औषधाचे परीक्षण प्राण्यांवर करण्यात आलेले आहे आणि या परीक्षणाचे निकाल उत्साहवर्धक असे आहेत. प्राण्यांच्या शरीरावर सर्वपिष्टीचे प्रयोग करण्यात आल्यानंतर सीआरसीला उत्साहवर्धक परिणाम प्राप्त झाले आहेत, तर या औषधाचे असेच परिणाम मानवांच्या शरीरावरील प्रयोगाद्वारेही प्राप्त केले जाऊ शकतात, अशी घटना म्हणजे कॅन्सरच्या उपचार इतिहासातील एका नव्या युगाचा प्रारंभ असेल.
सीआरसी ही विविध रोगांसाठी औषधांचे वैज्ञानिक परीक्षण करते. याच संदर्भात त्यांनी सर्वपिष्टीचेही वैज्ञानिक परीक्षण केले होते. कोणत्याही औषधाच्या परिणामकारकतेचा स्तर सुनिश्‍चित करण्यासाठी सामान्यत: दोन प्रकारची परीक्षणे केली जातात- पहिले, औषधविषयक (फार्माकोलॉजिकल) परीक्षण आणि दुसरे, विषकारकतेसंबंधीचे (टॉक्सिकोलॉजिकल) परीक्षण. हे परीक्षण आयात करण्यात आलेल्या सफेद उंदरांवर करण्यात आले. प्राण्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी टाकण्यात आल्या आणि जेव्हा ट्युमर तयार झाले तेव्हा आम्ही औषध देण्यास सुरुवत केली. ‘पोषण ऊर्जा’ परीक्षणाच्या स्थितीमध्ये १४ दिवसांनंतर ज्या प्रतिक्रिया दिसून आल्या, त्यामध्ये पेशींची संख्या स्पष्ट स्वरूपात कमी होणे चालू झाले होते. प्राण्यांमध्ये कोणत्याही अल्सरची निर्मिती झालेली नव्हती. ट्युमर विकसित होण्याचा दर ४६ टक्क्यांपेक्षा कमी झाला होता आणि औषधाच्या विषकारकतेचे प्रमाण जवळपास शून्य होते. अशा प्रकारचे सकारात्मक परिणाम नजीकच्या काळामध्ये दिसून आले नव्हते. या औषधामध्ये कॅन्सरला प्रतिबंध करण्याची आणि त्याच्याशी लढण्याची अपरिमित क्षमता आहे.
औषधाचे परीक्षण करण्याची आणि त्याची परिणामकारकता पाहण्याची एक सुनिश्‍चित अशी पद्धत आहे. पूर्व विष आणि औषधे यापासून नवीन औषध तयार करण्यात येते, परंतु त्यांच्यामुळे आरोग्य आणि जीवन संकटात तर येत नाही ना, हे पाहण्यासाठी पहिले परीक्षण केले जाते. डीएस रिसर्च सेंटरने तर मानवी खाद्यपदार्थांनी युक्त पोषण ऊर्जायुक्त औषध तयार केले होते. त्यामुळे हे औषध मानवाच्या आरोग्यासाठी पूर्णत: अनुकूल होते. तसेच दुग्धशर्करा हे औषध सेवनाचे माध्यम होते. हादेखील मानवी खाद्यपदार्थ असून, त्याचा आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. १९८२ या वर्षी सेंटरने कॅन्सरसाठी औषध तयार केले. या औषधाच्या परीक्षणासाठी सुरुवातीला अशी कार्यपद्धती ठरविण्यात आली होती की, या औषधाच्या वापरासाठी केवळ अशा रुग्णांचा शोध घेतला जाईल, ज्यांना रुग्णालयीन चिकित्सा पद्धतीने उपचारासाठी अयोग्य असल्याचे मानून अंतिम घटका मोजण्यासाठी सोडून दिले गेले आहे. अशा रुग्णांचा शोध घेतल्यानंतर त्या रुग्णांना पोषण ऊर्जेच्या मात्रा प्रदान करण्यात आया. त्यांना असेदेखील सांगण्यात आले की, ते स्वत:साठी आणि आरोग्यविकासासाठी जी काही औषधे आधीपासून घेत आहेत ती त्यांनी चालू ठेवावीत. सेंटरचे वैज्ञानिक डॉ. उमाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण उपक्रम सुरू झाला. अंतिमत: औषधाला मिळालेले यश आणि त्याच्या प्रभावाची, परिणामकारकतेची सकारात्मकता ही केवळ रुग्णांच्या अनुभवापर्यंतच मर्यादित राहिली नाही, तर परीक्षण अहवालांनीदेखील ते निकाल प्रमाणित केले. पारंपरिक चिकित्सा पद्धतीचा अवलंब करणार्‍या चिकित्सकांनादेखील त्याचे आश्‍चर्य वाटत राहिले.
डॉ. चॅटर्जी यांनी केलेल्या परीक्षणाद्वारे हे सिद्ध झाले की, हे औषध कॅन्सर रुग्णांवरील उपचारासाठी परिणामकारक आहे. हे विशेष नमूद करावेसे वाटते की, या परीक्षणाच्या यशाची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री तसेच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे. आतापर्यंत सर्व वितरण आणि उपचार लेखमाला यासह ९२६ रुग्णांची माहिती तीन भागांमध्ये डब्ल्यूएचओला पाठविण्यात आलेली आहे. सूचीमध्ये अशा रुग्णांची नावे समाविष्ट आहेत जे कधीकाळी मस्तिष्क, अग्राशय, यकृत, रक्त, जवळपास सर्व प्रकारच्या कॅन्सरने पीडित होते आणि आता सर्वसामान्य आणि आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत. एकदा भारतीय वंशाचे अमेरिकी कॅन्सर वैज्ञानिक स्वत: कॅन्सरग्रस्त झाल्यानंतर त्यांच्यावर या औषधाद्वारे उपचार करण्यात आला, या औषधाबद्दल जगाला तेव्हा माहीत झाले. न्यूयॉर्क हॉस्पिटल मेडिकल सेंेटर ऑफ क्वीन्सच्या रेडिएशन ऑन्कोलॉजीचे क्लिनिकल डायरेक्टर तसेच वेल मेडिकल कॉलेज ऑफ कॉरनेल युनिव्हर्सिटीच्या रेडिएशन ऑन्कोलॉजीचे असोशिएट प्रोफेसर डॉ. सुहृद पारीख यांनी कॅन्सर बरा झाल्यानंतर या औषधासंबंधी चर्चेसाठी मुंबई येथील जुहूस्थित हॉटेल सी प्रिन्सेसमध्ये एक संमेलन आयोजित केले होते. या संमेलनामध्ये मुंबईमधल्या अनेक रुग्णालयांमधील कॅन्सर विशेषज्ञांनी सहभाग घेतल होता. यामध्ये वाराणसीच्या डीएस रिसर्च सेंटरचे प्रमुख वैज्ञानिक प्रो. शिवशंकर यांना विशेषकरून बोलावण्यात आले होते. सर्व जिवंत उदाहरणांद्वारे सिद्ध करूनही आधुनिक चिकित्सा पद्धतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती हे मान्य करण्यास तयार नव्हती की, ज्या कॅन्सरवर विजय मिळविण्यासाठी सर्व जगातील रोगचिकित्सा वैज्ञानिक अयशस्वी झालेले आहेत, त्यावर भारतीय चिकित्सा पद्धतीद्वारे विजय मिळविण्यात आला आहे.

निरंकार सिंह, ९४५१९१०६१५