करिष्मासाठी वाट्टेल ते

0
327

मुंबई : अभिनेत्री करिष्मा कपूर आणि तिचा बहुचर्चित प्रियकर संदीप तोष्णीवाल यांच्यातील नात्यावरून आता पुन्हा चर्चा रंगण्यास सुरुवात झाल्याचे दिसते. याचे कारण ही तसेच आहे. करिष्मा कपूरने संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता करिष्माचा कथित प्रियकर म्हणजे संदीप तोष्णीवाल करिष्माचे पुन्हा प्रेम मिळविण्यासाठी स्वतःच्याच पत्नीला घटस्फोट देण्याच्या तयारीला लागला आहे. आपली माझी पत्नी अर्शिता मनोरूग्ण असल्याचे सांगत त्याने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचे समजते. संदीप तोष्णीवाल आणि अर्शिता यांना दोन मुली आहेत. गेल्या काही काळापासून करिष्मा व संदीप एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत आहे.