गोडलवाहीत गावकर्‍यांनी केली हत्यारे जमा

0
106

तभा वृत्तसेवा
गडचिरोली, १२ फेब्रुवारी
पेंढरी उपविभागात येणार्‍या गोडलवाही पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील गावकर्‍यांनी रविवार, १२ रोजी पोलिस व सीआरपीएफ अधिकार्‍यांसमोर २३ भरमार रायफल व १३ बॅरल स्वतःहून जमा केले.
पेंढरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोडलवाही पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी व इतर अधिकार्‍यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भयमुक्त निवडणुका पार पडाव्या, यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील गावकर्‍यांना त्यांच्याजवळ असलेली हत्यारे पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत पदाबोरिया, गोडलवाही, गोडलवाही टोला, पावरवेल, हिपानेर, कुपानेर, तिरनपार येथील ग्रामस्थांनी २३ भरमार बंदुका व १३ बॅरल गोडलवाहीचे प्रभारी अधिकारी सचिन सरडे, गजानन गोटे, किशोरकुमार खाडे व ११३ बटालियन सीआरपीएफचे असिस्टंड कमांडण्ट विलास कुंभार या अधिकार्‍यांसमोर जमा केली.
यावेळी पोलिस विभागातर्फे उपस्थित गावकर्‍यांचे आदरातिथ्य करण्यात आले व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले.