मार्कंडेश्‍वर देवस्थानचे उपाध्यक्ष मनोज पालारपवार यांचे निधन

0
161

तभा वृत्तसेवा
चामोर्शी, १२ फेब्रुवारी
येथील हनुमाननगरातील रहिवासी मार्कंडेश्‍वर देवस्थानचे उपाध्यक्ष तथा आर्यवैश्य स्नेह मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सचिव मनोज पालारपवार यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा बराचमोठा आप्तपरिवार आहे.
रविवारी दुपारी ४.४५ वाजता चामोर्शी येथील त्यांच्या राहत्या घरून हजारोंच्या उपस्थितीत अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर मार्कंडा येथील वैनगंगा नदीकाठावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर धर्मशाळेचे उपाध्यक्ष रामेश्‍वर काबरा यांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.