‘नाम शबाना’चे ट्रेलर प्रदर्शित

0
236

मुंबई : चित्रपटाचे कथानक पुढे घेऊन जाणारे सिक्वेल बॉलीवूडसाठी नवीन नाहीत. मात्र, हॉलिवूडमध्ये दिसणार्‍या प्रिक्वेलचे प्रस्थ आता हिंदी चित्रपटात आले आहे. दिग्दर्शक नीरज पांडे बेबी चित्रपटाचा प्रिक्वेल ‘नाम शबाना’ घेऊन येत आहे. नाम शबानाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बेबी चित्रपटात पडद्यावर घडलेल्या कथानकाच्या आधीची कथा प्रिक्वेलच्या माध्यमातून उलगडणार आहे. २०१५ साली नीरज पांडे दिग्दर्शित बेबी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचा प्रिक्वेल नाम शबाना ३१ मार्चला प्रदर्शित होत आहे. बेबी चित्रपटात गुप्तचर संघटनेत काम करणारी शबाना अर्थात तापसी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आपल्या ऍक्शन दृश्यांनी तापसीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सामान्य शबानाचा रॉ एजंट म्हणून बेबी मिशनमध्ये सहभागी होण्यापर्यंतचा प्रवास नाम शबाना चित्रपटात दाखवण्यात आला आहे.