सचिन व लतादीदी माझ्या शोमध्ये येत नाहीत : कपिल

0
248

बिकानेर : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलीवूड आणि क्रिकेट विश्‍वातील मोठमोठे तारे दिसले आहेत. पण काही तारे असेही आहेत, ज्यांना कपिल शर्माने अनेक वेळा त्याच्या शोमध्ये आणण्याचे प्रयत्न केले आहेत. पण काही ना काही कारणाने त्यांनी कपिलला नकार दिला आहे. या कलाकारांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा समावेश आहे. कपिल म्हणाला, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर हे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. ते माझा शो पाहतात. मी त्यांना शोमध्ये येण्याचे आमंत्रण देतो, तेव्हा आम्ही शोमध्ये येऊन काय बोलणार, असे उत्तर ते देतात. लतादीदींनी मला एक घड्याळ भेट म्हणून दिले आहे. मी ते जपून ठेवले आहे. माझ्या शोमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन आले होते, तो अतिशय उत्कट क्षण होता, असेही कपिलने सांगितले.