सिमेंट पोल अंगावर पडल्याने दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

0
118

एक गंभीर जखमी, ट्रॅक्टर चालक फरार
तभा वृत्तसेवा
घाटंजी, १४ फेब्रुवारी
तालुक्यातील पारवा चौफुलीवर सिमेंटचे पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्यामुळे त्या पोलखाली दबून तीन इसमांचा मृत्यू, तर एक इसम गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून अपघातास जबाबदार असलेला ट्रॅक्टरचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. टिपेश्‍वर येथील उर्वते यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमधून सिमेंटचे वीजखांब वाहून नेले जात होते.
पारवा चौफुलीवर येताच भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले. सिमेंटचे पोल अंगावर पडल्याने त्या पोलखाली प्रशांत चौधरी रा. वाढोणा, हनुमान येडमे व पांडुरंग येडमे रा. टिपेश्‍वर हे ठार झाले. लिंबादेवी येथील अजय वड्डे हा गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या प्रकरणाचा अधिक तपास पारवा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात जमादार रमेश बंडेवार व अभिमान आडे करीत आहेत.