केतकी माटेगावकरला चाहत्यांकडून मनस्ताप

0
261

जळगाव : ‘टाईमपास’ फेम अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरला जळगावात चाहत्यांकडून मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. केतकीचे वडील पराग माटेगावकर यांनी यासंदर्भात पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनासाठी केतकी जळगावात आली होती. मात्र, तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरून उतरताना चाहत्यांनी तिच्याभोवती गराडा घातला. त्यामुळे तिला तिथून बाहेर पडता आले नाही. अखेर उपस्थित काही महिलांनी हाताचे कडे करून केतकीला बाहेर काढून गाडीपर्यंत पोहोचवले, असे पराग माटेगावकर यांनी पत्रात लिहिले आहे. तिच्या वडिलांनी या प्रकारासाठी आयोजकांना दोषी धरलं आहे. घडलेल्या प्रकाराचा तिला आणि तिच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप झाल्याचे त्यांनी सांगितले.