विराटने दिले अनुष्कावरीवल प्रेमाचे ‘संकेत’

0
224

मुंबई : ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमप्रकरणाविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जातात. दोघांनीही याबाबत अधिकृत वाच्यता केली नसली, तरी विराट कोहलीने त्यांच्या प्रेमाबाबत उघड संकेत दिले आहेत. ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘‘जर तुमची इच्छा असेल, तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असतो. तू माझ्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे करतेस,’’ अशा आशयाच्या ट्विटसोबत विराटने अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला आहे. आतापर्यंत अनुष्काशी नाव जोडले गेल्याने आगपाखड करणार्‍या विराटने असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे साहजिकच सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विराट आणि अनुष्काला एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, मधल्या काळात त्यांच्या नात्यातही बॅड पॅच आल्याचे म्हटले जायचे. दोघांचे ब्रेक अप झाल्याच्या चर्चा होत्या, मात्र पुन्हा दोघेही एकत्र दिसले.