अमित शाह यांची संपत्ती जाहीर, आता उद्धवची करणार का? : माधव भांडारी

0
183

वृत्तसंस्था
मुंबई, १६ फेब्रुवारी
अमित शाह यांनी २००७ मध्ये ५ कोटी ५७ लाख एवढी संपत्ती दाखविली होती, तर २०१२ च्या विधानसभेला ११ कोटी ७७ लाख दाखविली आहे, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संपत्ती जाहीर करा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची संपत्ती अगोदर जाहीर करावी, त्यानंतर ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीबद्दल बोलावे, असे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले होते. त्यानंतर भाजपाकडून अमित शाह यांच्या संपत्तीचे प्रतिज्ञापत्र दाखविण्यात आले.
ठाकरे कुटुंबाची सात बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील बुधवारच्या सभेत उद्धव ठाकरे त्यांची संपत्ती जाहीर करणार का, असा सवाल विचारला होता.
याबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे आरोप फेटाळले.
दरम्यान किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांची संपत्ती दाखविली, आता तुमची दाखवा, त्या सात कंपन्यांसोबतचे आर्थिक व्यवहार समोर येण्याची भीती आहे का, असा सवाल सोमय्यांनी केला आहे.