हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते

0
117

विनोद तावडे यांचा गौप्यस्फोट
वृत्तसंस्था
पुणे, १६ फेब्रुवारी
माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, पण त्यांना मी रोखले, असा गौप्यस्फोट भाजपा नेते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भिगवण येथील सभेत ते मार्गदर्शन करीत होते.
ते म्हणाले, हर्षवर्धन पाटील हे गोपीनाथ मुंडे यांचे लाडके होते. परवापर्यंत आमचे सरकार सत्तेत येईपर्यंत सर्वाधिक सत्तेत कोण राहिले तर हर्षवर्धन पाटील. आधी आमच्याबरोबर, मग आम्ही जातोय हे कळल्या-कळल्या त्यांनी कॉंग्रेसमध्ये उडी मारली. मग विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे आमच्याकडे (भाजपात) येणार होते. पण मीच त्यांना घेऊ नका असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. तावडे यांच्या या गौप्यस्फोटाने इंदापुरात एकच खळबळ उडाली.