सचिन पडला हिनायाच्या प्रेमात

0
160

वृत्तसंस्था
मुंबई, १६ फेब्रुवारी
क्रिकेट विश्‍वातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विश्‍वविख्यात फिरकीपटू हरभजन सिंह याची कन्या हिनायासोबतचे छायाचित्र अनेकांना बोलते करीत आहे. त्या छायाचित्रामध्ये हिनायाने, सचिनचे गाल धरताच मास्टर ब्लास्टर हास्याच्या दुनियेत रंगून गेला.
सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या एका जाहिरातीच्या शूटसाठी एकत्र आले होते. त्यावेळी हरभजनसिंह त्याच्या मुलीसोबत तेथे आला होता.
हिनायाचा जन्म जुलैमध्ये लंडनमध्ये झाला. त्यानंतर हरभजनसिंह आणि त्याची पत्नी गीता बसरा लंडनमध्येच होते. गीताचे कुटुंब हे लंडनमध्ये आहे. गत वर्षी डिसेंबर महिन्यात गीता, मुलीसोबत भारतात आली आहे.