अनुराग ठाकूर यांची विनाअट क्षमायाचना

0
134

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी उच्च न्यायालयात विनाअट क्षमायाचना केली.
प्रतिज्ञापत्रात अनुराग ठाकूर यांनी नमूद केले की, न्यायालयाच्या आदेशासंदर्भात जर न्यायालयाला मी काही अडचण निर्माण केली आहे असेे वाटत असेल तर मी न्यायालयाची क्षमा मागतो.
मला न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाची अवहेलना करावयाची नव्हती, याकडे लक्ष वेधून अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले की, मी कमी वयातच सार्वजनिक जीवनात उतरलो होतो आणि तीन वेळा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो. त्याकडे बघता मी न्यायालयाचा सन्मानच करतो. मी कोणतेही खोटे प्रतिज्ञापत्र सादर केलेले नव्हते. इतकेच नव्हे, तर न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केलेले नव्हते. मी फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी दुबईत उपरोक्त विषयावर चर्चा करून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता व तशी बाजू न्यायालयात मांडली होती, याकडे अनुराग ठाकूर यांनी लक्ष वेधले.