आयपीएलच्या दहाव्या सत्राचे वेळापत्रक जाहीर

0
263

वृत्तसंस्था
मुंबई, १६ फेब्रुवारी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल २०१७) फेरीपत्रक जाहीर केले आहे. यंदा ही स्पर्धा ४७ दिवस खेळली जाणार आहे. आयपीएलच्या दहाव्या सत्राचे उद्‌घाटन ५ एप्रिलला हैदराबादमध्ये होणार आहे. या दिवशी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु संघात सामना खेळला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये २१ मे रोजी होणार आहे.
स्पर्धेतील प्रत्येक संघाला १४ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. ४७ दिवस आयपीएल चाहत्यांना धडाकेबाज क्रिकेट खेळाची मेजवानी मिळणार आहे. १० वेगवेगळ्या मैदानांवर सामने होतील. प्रत्येक संघाला मिळणार्‍या १४ सामन्यांपैकी सात लढती त्या-त्या संघांच्या स्वमैदानावर खेळल्या जाणार आहेत. २०११ नंतर पहिल्यांदाच मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आयपीएल सामने होणार आहेत.
पात्रता व बाद फेरींच्या लढतीचे स्थान गुलदस्त्यात
या मोसमाचा पहिला पात्रता फेरीचा सामना १६ मे रोजी खेळवला जाईल.
तर बाद फेरी १७ मे रोजी होईल. यानंतर दुसरा पात्रता फेरीचा सामना १९ मे रोजी खेळवण्यात येणार आहे. पण त्या सामन्यांच्या लढतीचे मैदान निश्‍चित झालेले नाही.
आईपीएल-१० चे फेरीपत्रक
५ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु (हैदराबाद, रात्री ८ वाजता).
६ एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स (पुणे, रात्री ८ वाजता).
७ एप्रिल : गुजरात लॉयन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (राजकोट, रात्री ८ वाजता).
८ एप्रिल : किंग्ज एलेव्हन पंजाब वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (इंदूर, दुपारी ४ वाजता).
८ एप्रिल : रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (बंगळुरु, रात्री ८ वाजता).
९ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात लॉयन्स (हैदराबाद, दुपारी ४ वाजता).
९ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (मुंबई, रात्री ८ वाजता).
१० एप्रिल : किंग्ज एलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू (इंदूर, रात्री ८ वाजता).
११ एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (पुणे, रात्री ८ वाजता).
१२ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (मुंबई, रात्री ८ वाजता).
१३ एप्रिल : कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज एलेव्हन पंजाब (कोलकाता, रात्री ८ वाजता).
१४ एप्रिल : रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु वि. मुंबई इंडियन्स (बंगळुरु, दुपारी ४ वाजता)
१४ एप्रिल : गुजरात लॉयन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (राजकोट, रात्री ८ वाजता).
१५ एप्रिल : कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता, दुपारी ४ वाजता).
१५ एप्रिल : दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. किंग्ज एलेव्हन पंजाब (दिल्ली, रात्री ८ वाजता).
१६ एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. गुजरात लॉयन्स (मुंबई, दुपारी ४ वाजता).
१६ एप्रिल : रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (बंगळुरु, रात्री ८ वाजता).
१७ एप्रिल : दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (दिल्ली, दुपारी ४ वाजता).
१७ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज एलेव्हन पंजाब (हैदराबाद, रात्री ८ वाजता).
१८ एप्रिल : गुजरात लॉयन्स वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु (राजकोट, रात्री ८ वाजता).
१८ एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (हैदराबाद, रात्री ८ वाजता).
२० एप्रिल : किंग्ज एलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स (इंदूर, रात्री ८ वाजता).
२१ एप्रिल : कोलकाता नाईटरायडर्स वि. गुजरात लॉयन्स (कोलकाता, रात्री ८ वाजता).
२२ एप्रिल : दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स (दिल्ली, दुपारी ४ वाजता).
२२ एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद (पुणे, रात्री ८ वाजता).
२३ एप्रिल : गुजरात लॉयन्स वि. किंग्ज एलेव्हन पंजाब (राजकोट, दुपारी ४ वाजता).