राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसली इवांका ट्रम्प

0
228

सोशल मीडियावर जोरदार टीका
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी
आपली मुले कितीही लाडकी असली तरी त्यांचे लाड फक्त घरातच करायचे, याचे भान अनेकांना राहत नाही. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तर आपल्या तरुण मुलीला राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसविण्याचा विक्रम केला आहे. सोशल मीडियावर एक फोटो ट्रम्प यांची कन्या इवांका हिने शेअर केला असून, या फोटोवरून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची कॅनेडियन राष्ट्राध्यक्षांनी ओव्हल ऑफिसमध्ये भेट घेतली यावेळी इवांकाही तिथे उपस्थित होती. या भेटीनंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. यात ती ओव्हल ऑफिसमधील राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसली होती. तिच्या एका बाजूला ट्रम्प तर दुसरीकडे कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन त्रुदेवू उभे होते. जरी हे ऑफिस आता इवांकाच्या वडिलांचे झाले असले तरी त्या खुर्चीचा मान तिने ठेवायला हवा होता, अशी टीका तिच्यावर होत आहे. देशातील सगळ्यात जबाबदार व्यक्ती या खुर्चीवर बसते. ती फक्त खुर्ची नाही तर तिचा मानही असल्यामुळे शिष्टाचाराचा भाग आणि खुर्चीचा मान ठेवत तरी इवांकाने तिथे बसायला नको होते, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.