शिर्डी संस्थानावर आएएस अधिकारी नेमा : सर्वोच्च न्यायालय

0
106

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी
जगातील श्रीमंत देवस्थानामध्ये गणना होणर्‍या शिर्डी साई संस्थानाचा कारभार आयएएस अधिकार्‍याच्या हाती सोपवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
त्यामुळे वर्षाला ४०० कोटींचे उत्पन्न असणार्‍या साई संस्थानाचा कारभार, १५ मार्च २०१७ पासून आयएएस दर्जाच्या अधिकार्‍याच्या हाती सोपवावा लागणार आहे.
अडीच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साईबाबा संस्थानचा कार्यकारी अधिकारी, आयएएस दर्जाचा असावा असा निर्णय दिला होता.
मात्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्या निर्णयावर स्थगिती आणली होती.
मात्र राजेंद्र गोंदकर आणि संदीप कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णय कायम ठेवला.
वार्षिक ४०० कोटी उत्पन्न असणार्‍या साई संस्थानाकडे आज १८२६ कोटी रुपयांच्या विविध बँकांत ठेवी असून, ३७१ किलो सोने, तर ४३४० किलो चांदी आहे, हे विशेष.