बाहेरील व्यक्तीला दत्तक घेण्याची उत्तरप्रदेशला गरज नाही

0
144
उपस्थितांना अभिवादन करताना प्रियंका व राहुल गांधी

प्रियंका गांधींचे थेट पंतप्रधानांवर टीकास्त्र
वृत्तसंस्था
रायबरेली, १७ फेब्रुवारी
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज शुक्रवारी हल्लाबोल केला. स्वतःच्या विकासासाठी बाहेरच्या व्यक्तीला दत्तक घेण्याची उत्तर प्रदेशला गरज नाही, या शब्दात प्रियंका गांधी यांनी आज रायबरेली येथील जाहीर सभेत निशाणा साधला.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची आज रायबरेली येथे प्रचार सभा झाली.
यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या, मला उत्तर प्रदेशने दत्तक घेतले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. पण या राज्यातील प्रत्येक तरुण हा नेता बनू शकतो. कारण त्यांच्यात तितकी योग्यता आहे. मोदींचे सरकार केंद्रात आले. तीन वर्षे झाली. पण अद्यापही वाराणसीसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, असेही त्या म्हणाल्या.
या सभेत राहुल गांधींनीही उपस्थित जनतेला संबोधित केले. शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात यावे, यासाठी मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. मात्र, त्यावर मोदी यांनी प्रतिसाद दिला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.