शशांकसोबत ती युवती कोण?

0
583

मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘होणार सून मी या घरची’ मधील श्री अर्थात शशांक केतकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. शशांकने नुकताच फेसबुकवर एका युवतीसह फोटो अपलोड केला आहे. त्यामुळे शशांकसोबतची ‘ती’ कोण असाच प्रश्‍न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. शशांकसोबत असलेल्या त्या तरुणीचे नाव प्रियंका ढवळे असल्याची माहिती आहे. शशांकसह तिच्याही फेसबुवकर या दोघांचा प्रोफाईल फोटो आहे. त्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. ‘होणार सून मी नंतर’ शशांक सध्या झी युवा वाहिनीवरील ‘इथेच टाका तंबू’ या मालिकेत भूमिका करीत आहे.