करिष्मा व संदीपच्या प्रेमप्रकरणाची चर्चा

0
286

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांचा वाढदिवस कपूर खानदानाने १५ फेब्रुवारी रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबीय उपस्थित होते. या गर्दीत एक चेहरा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. तो म्हणजे करिश्माचा बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवाल. गेल्या काही दिवसांपासून करिष्मा आणि संदीपच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा बॉलीवूड वर्तुळात सुरू आहे.
आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या समारंभाला करिष्मा संदीपला सोबत घेऊनच तेथे दाखल झाली होती. यावरून हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोत रणधीर आणि बबितासोबत करिश्मा आणि संदीप दिसत आहेत. करिष्माने पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला आहे. तर संदीप त्याच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेण्याच्या प्रयत्नात आहे.