पाकी अभिनेत्रीची बॉलीवूड कलावंतांवर टीका

0
207

नवी दिल्ली : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्या एका जुन्या व्हिडिओनंतर आता आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. सबा कमर हिचा बॉलीवूडच्या कलाकारांवर टीका करणारा हा व्हिडिओही जुनाच आहे. यात ती हृतिक रोशनपासून सलमान खानपर्यंत अनेक बॉलीवूड अभिनेत्यांवर जीभ सैल सोडताना दिसतेय्. एका पाकिस्तानी टीव्ही शोचा हा व्हिडिओ आहे.
उल्लेखनीय म्हणजे, सबा ही लवकरच बॉलीवूड अभिनेता इरफान खान सोबत ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.