बाबाजी दाते महिला बँकेला बँको पुरस्कार

0
129

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, १७ फेब्रुवारी
अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलेक्सी इन्फा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २०१६ च्या बँको पुरस्काराकरिता बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची निवड करण्यात आली.
अलीबागच्या रॅडिसन ब्लू रिसॉर्ट येथे पुरस्कार वितरण समारंभ झाला. कार्यक्रमाला गॅलेक्सी इन्फाचे संचालक अशोक नाईक, अविजचे मुख्य संपादक चंद्रकांत शित्रे, सहकार आयुक्त व निबंधक दळवी, सीडॅकचे संचालक व नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
बँको पुरस्कार स्वीकारण्यासाठी बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या संचालक ललिता निवल, सुशीला पाटील, ऍड. नीला देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन, सहायक महाव्यवस्थापक शीला हिरवे, अधिकारी शिल्पा पाटील उपस्थित होत्या. या यशाचे श्रेय बँक खातेदार, ठेवीदार व सर्व सभासदांना जाते. बँकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.