साप्ताहिक राशिभविष्य

0
656

रविवार, १९ ते २५ फेब्रुवारी २०१७
सप्ताह विशेष
•सप्ताह विशेष- सोमवार,२० फेब्रुवारी- स्वामी रामदास नवमी, सौर (भारतीय) फाल्गुन मासारंभ; •मंगळवार, २१ फेब्रुवारी- भद्रा पहाटे ५.४० ते १८.४२; •बुधवार, २२ फेब्रुवारी- विजया एकादशी, श्री गोळवळकर गुरुजी जन्मदिन; •गुरुवार, २३ फेब्रुवारी- रामानंद जालनेकर महाराज जयंती, साखरखेर्डा; •शुक्रवार, २४ फेब्रुवारी- प्रदोष, महाशिवरात्री (महानिशीथकाल रात्री १२.१० ते १.००), शंभू महादेव यात्रा- सालबर्डी (अमरावती), श्री व्यंकटनाथ महाराज पुण्यतिथी; •शनिवार, २५ फेब्रुवारी- श्री मेहेरबाबा जयंती, सोमेश्‍वर महाराज यात्रा- सोमेश्‍वर (अकोला), अमावास्या प्रारंभ- रात्री ९.१८.

संक्षिप्त मुहूर्त- साखरपुडा- १९ फेब्रुवारी; बारसे- २२ फेब्रुवारी; जावळे- २२ फेब्रुवारी; गृहप्रवेश- १९फेब्रुवारी.

मेष : आर्थिक व्यवहारात सावध
या आठवड्यातील प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी मंगळ व्ययस्थानात शुक्रासोबत आहे. या दोघांवरही गुरुची शुभ दृष्टी आहे. शनि भाग्यात तर रवि लाभात आहे. बुध २२ ला मकरेतून कुंभेत लाभस्थानी जाईल. चंद्र अष्टम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर लाभ स्थानात येईल. हा आठवडा आपणांस संमिश्र स्वरूपाचा जावा. साधारणतः मौज-मजा, करमणुकी, प्रवास-पर्यटन यावर खर्च वाढण्याची शक्यता आहे. काहींना कुसंगतीचा, व्यसनांचा व त्यातून प्रकृतीसंबंधी त्रास निर्माण होऊ शकतो. तरुणांना प्रेमसंबंधातून मनस्ताप संभवतो. कायदेशीर चौकट मोडू नये. आर्थिक व्यवहारात सावध राहा. शुभ दिनांक- २१,२२,२३.
वृषभ : झटपट निर्णयातून लाभ
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी शुक्र लाभ स्थानात मंगळासोबत आहे. येथे शुक्र उच्च स्थितीत आहे. गुरु शुक्राला पहात आहे.योगकारक शनि अष्टमात व रवि दशमात आहे. बुध २२ ला मकरेतून कुंभेत दशमस्थानी जाईल. चंद्र या आठवड्यात सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो दशम स्थानात येईल. या आठवड्यात आपला आर्थिक आलेख निश्‍चितपणे उंचावताना जाणवेल. व्यवसायात अर्थलाभ संभवतो. जुनी येणी मिळू शकतील. नोकरीत असलेल्यांना काही झटपट निर्णयातून लाभ संभवतो. मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. युवावर्गास नोकरी-व्यवसाय, विवाहादीचे शुभ योग यावेत.
शुभ दिनांक- १९,२०,२४.
मिथून : अचानक मोठ्या संधी
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी बुध अष्टमस्थानात आहे. तो २२ ला अष्टमातील मकरेतून नवमस्थानी कुंभेत जाईल. शनि सप्तमात आहे. दशमात मंगळ-शुक्र गुरुच्या कृपादृष्टीत आहेत. चंद्र षष्ठ स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो भाग्य स्थानात जाईल. याआठवड्यात काही उत्साहवर्धक योग आपल्या वाट्यास अचानकपणे येऊ शकतील. नोकरी-व्यवसायात उत्कर्ष, अचानक मोठ्या संधी मिळू शकतात, धनलाभ होऊ शकतो. साहित्य, क्रीडा, कला क्षेत्रातील लोकांना सन्मान, प्रतिष्ठा लाभेल. कामाचे कौतुक होईल. युवकांना शिक्षण, नोकरी या अनुषंगाने लाभदायक योग यावेत. शुभ दिनांक- २०,२१,२२.
कर्क : नोकरी-व्यवसायात प्रगती
आपला राशीस्वामी चंद्र या पंचम स्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर अष्टम स्थानात येईल. याशिवाय या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. शनि षष्ठात व रवि अष्टमात आहे. बुध २२ ला अष्टमस्थानी जाईल. भाग्यात मंगळ व शुक्र असून त्यांच्यावर गुरुची दृष्टी आहे. या आठवड्यात सुरुवातीचा काळ आपणास उत्तम जावा. राशीस्वामी चंद्र अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात बढती, वाढ, प्रगती देणारा हा काळ आहे. काहींना पदोन्नतीसंबंधी हालचाली होताना दिसू शकतात. कौटुंबिक स्तरावर मात्र काहीसे असमाधानाचे चित्र आहे. पती-पत्नीचे अस्वास्थ्य, आर्थिक पेच संभवतात. शुभ दिनांक- २२,२३,२४.
सिंह : कुटुंबात असमाधान, नाराजी
या आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशीस्वामी रवि सप्तम स्थानी आहे. याशिवाय राशीस्थानी राहू, धनस्थानात गुरु, शनि पंचमस्थानात तर, मंगळ व शुक्र अष्टम स्थानात आहेत. त्यांच्यावर गुरुची दृष्टी आहे. बुध २२ ला सप्तमस्थानी कुंभ राशीत जाईल. चंद्र सुखस्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर सप्तम स्थानी येईल. हा आठवडा आपणांस विशेषतः व्यवसायात अचानक लाभाचा व प्रगतीचा ठरू शकतो. सुरुवात जेमतेमच होणार असली तरी मधला काल उत्तम ठरू शकतो. कोर्टाची प्रकरणे, वारसाचे प्रकरण, यात आपणांस फायदा व्हावा. कुटुंबात मात्र असमाधान, काहीसा संघर्ष, मतत्रिन्नता, नाराजी उत्पन्न होऊ शकते. काहींना प्रकृतीचा त्रास होऊ शकतो. नुकसान देखील संभवते. शुभ दिनांक- १९,२१,२३.
कन्या : भाग्यवर्धक संधी लाभतीत
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशीस्वामी बुध पंचमस्थानात असून तो २२ तारखेला षष्ठातील कुंभ राशीत जाईल. याशिवाय षष्ठात रवि, सप्तमात शुक्र-मंगळ, सुखस्थानात शनि व राशीस्थानात गुरु आहे. चंद्र पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर षष्ठ स्थानात जाईल. प्रिय व्यक्ती तसेच संततीला, मुलाबाळांना विशेष उपयुक्त असा हा आठवडा असणार आहे. शिक्षण क्षेत्र, साहित्य व कलाक्षेत्रातील व्यक्तींना देखील अतिशय उत्साह व प्रगतीचे वातावरण या सप्ताहात जाणवावे. तरुण वर्गाला भाग्यवर्धक संधी लाभतीत, नोकरी, शिक्षणासाठी विदेशात जाऊ इच्छिणार्‍यांसाठी अनुकूल घडामोडी घडू शकतात. काहींना अनारोग्याचे भय राहील. शुभ दिनांक- २३,२४,२५.
तूळ : अपेक्षित परिणाम दिसतील
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशीस्वामी शुक्र षष्ठात मंगळासोबत असून त्यांच्यावर गुरुची शुभ दृष्टी आहे. शनि पराक्रमात, तर रवि पंचमात आहे. बुध २२ ला पंचमस्थानी कुंभ राशीत जाईल. चंद्र या आठवड्याच्या सुरुवातीला धनस्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर पंचम स्थानात जाईल. या आठवड्यात आपणास मोठ्यावस्तुंच्या खरेदीचे योग यावेत. वाहन, घर वा अन्य विशेषतः आपली आवड-निवड जपणार्‍या वस्तुंची खरेदी संभवते. खर्च वाढेल पण तो वाया जाणार नाही. कला, छंद, साधना यातून आपण अपेक्षित परिणाम साधू शकाल. काहींना मात्र आग, वीज यापासून सावध राहण्याची गरज आहे.
शुभ दिनांक- १९,२०,२२.
वृश्‍चिक : आर्थिक बळकटी लाभेल
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशीस्वामी मंगळ पंचमात शुक्रासोबत गुरुच्या शुभ दृष्टीत आहे. शनि धनस्थानी तर रवि सुखस्थानात आहे. बुध देखील २२ ला सुखस्थानी जाईल. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आपल्याच राशीतून भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर सुखस्थानी येणार आहे. या आठवड्यात जीवनातील काही महत्त्वाच्या पैलूंना बळकटी देणारे योग काहींना अवश्य लाभू शकतात. त्यामुळे विशेषतः युवावर्गाला नोकरी, विवाह, विदेशवारी या दृष्टीने काही महत्त्वाच्या हालचाली घडत असल्याचे जाणवावे. जीवनमान उंचावणारे हे ग्रहमान आहे. आर्थिक बळकटी लाभेल. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबात समाधान राहील. शुभ दिनांक- १९,२०,२१.
धनू : आनंददायी अनुभव लाभणार
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशीस्वामी गुरु दशमात असून शनि राशीस्थानीआहे. मंगळ-शुक्र सुखस्थानात आहेत. बुध धनस्थानातून २२ ला पराक्रमात रविच्या सोबतीला जाणार आहे. चंद्र व्यय स्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करणार असून तो आठवडाअखेर पराक्रम स्थानात येणार आहे. नवीन घरात प्रवेश, नोकरीत उत्कर्ष, व्यवसायात वाढ, नवीन फायदेकारक करार, नवीन वाहनाची खरेदी अशा एक ना अनेक आनंददायी घटनांनी युक्त हा आठवडा आपल्यापैकी अनेकांना अनुभवास येणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहावी. साडेसातीचे भान ठेवा. उगाच बढाया मारू नये व क्षमतेपेक्षा मोठ्या गोष्टींकडे धाव घेऊ नये.
शुभ दिनांक- २१,२२,२३.
मकर : व्यावसायिक स्पर्धेत सरसी
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशीस्वामी शनि व्ययस्थानात असून राशीस्थानी बुध आहे. रवि धनात आहे. शुक्र व मंगळ पराक्रमात असून त्यांच्यावर भाग्यस्थानातील गुरुची दृष्टी आहे. अष्टमात राहू आहे. बुध २२ ला पराक्रमात जाईल.चंद्र लाभ स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो धनस्थानी जाणार आहे. उत्तम ग्रहमानाच्या या आठवड्यात काही अभूतपूर्व संधींचा लाभ व्हावा. नोकरीत आपले महत्त्व वाढेल. व्यावसायिक स्पर्धेत सरसी होईल. सरकारी कामात यश मिळेल. कामे वेगाने पुढे सरकतील. जोडीदाराच्या तसेच मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. उत्सव-समारंभाचे आयोजन व्हावे.
शुभ दिनांक- २३,२४,२५.
कुंभ : चांगल्या संधी लाभतील
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशीस्वामी शनि लाभस्थानात असून राशीत रवि व केतू आहे. गुरु अष्टमात, तर योगकारक शुक्र मंगळाच्या सोबतीने धनस्थानात आहे. व्यय स्थानात बुध आहे. तो २२ ला आपल्या राशीत येईल. चंद्र दशम स्थानातून या आठवड्यातील भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो आपल्या राशीत जाईल. या आठवड्यातील ग्रहमान पाहता व्यावसायिक व आर्थिक घडी बसविण्यात यश मिळेल. आर्थिक बळकटी लाभेल. नोकरीसाठी प्रयत्नशील युवांना चांगल्या संधी लाभू शकतात. अचानक धनलाभ संभवतो. घरात चांगल्या बातम्या कानी पडतील. जमीन-घराच्या खरेदीचे प्रयत्न होतील. शुभ दिनांक- २०,२१,२२.
मीन : व्यावसायिक यशाचे समाधान
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशीस्वामी गुरु सप्तम स्थानात असून राशीस्थानी मंगळ आणि शुक्र आहेत. शनि दशमात, तर रवि व्ययात आहे. लाभात असलेला बुध २२ ला व्ययात जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आपल्या भाग्य स्थानातून भ्रमण सुरु करीत असून तो शेवटी व्यय स्थानात जाणार आहे. नोकरीत तसेच व्यवसायात मोठ्या संधी देणारे ग्रहमान या आठवड्यात आपणास लाभले आहे. व्यावसायिक यशाचे हे योग आहेत. आपल्या जोडीदाराचाही उत्कर्ष होताना पाहून समाधान मिळेल. परदेश गमनाच्या संधी येऊ शकतात. काहींना मात्र किरकोळ अपघाताचे भय राहील. वीज, आगीची उपकरणे वापरताना सतर्क असावे, वाहने काळजीपूर्वक चालवावीत. शुभ दिनांक- १९,२१,२४.