संजय बल्लाळ यांना मातृशोक

0
106

तभा वृत्तसेवा
अमरावती, १९ फेब्रुवारी
रा. स्व. संघाचे स्वयंसेवक संजय बल्लाळ यांच्या मातोश्री सुमन यशवंत बल्लाळ यांचे रविवार, १९ रोजी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात राजीव, संजय, धनंजय ही तीन मुले, शोभा काळे ही विवाहित कन्या, नातवंडे, जावई, व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
अंबिकानगर येथील त्यांच्या निवासस्थानाहून सोमवार, २० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे