महिला बँकेला राजमाता जिजाऊ पुरस्कार

0
97

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २७ फेब्रुवारी
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचा २१ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मुंबईच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत पार पडला. २०१५-१६ चा राजमाता जिजाऊ उत्कृष्ट महिला सहकारी बँक पुरस्कार संपूर्ण महाराष्ट्रातून यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेला प्राप्त झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर होते. पारितोषिक स्वीकारण्यास बँकेच्या अध्यक्ष विद्या केळकर, संचालक ललिता निवल, गीता मालीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन, उपमहाव्यवस्थापक राजश्री शेवलकर, अधिकारी सोनाली येंडे उपस्थित होत्या.
या यशाचे श्रेय बँकेने खातेदार, ठेवीदार, सभासद, हितचिंतक, कर्मचारी व ठेवी प्रतिनिधी ह्यांना दिले आहे. हा पुरस्कार बाबाजी दाते महिला सहकारी बँकेला ४ वर्षांपासून सातत्याने मिळत आहे. सर्वत्र बँकेचे अभिनंदन होत आहे.