प्रियंकाशी शत्रुत्व नाही : दीपिका

0
367

मुंबई : विन डिझेलसोबत ‘एक्सएक्सएक्स : रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटामध्ये काम करत दीपिकाने अनेकांना तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची भुरळ घातली होती. भारतात तिच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरीही जागतिक स्तरावर मात्र तिच्याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. द रिटर्न ऑफ झेंडर केज या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने दीपिका आणि विन डिझेलने परदेशवारीही केली. पण, या सर्व दौर्‍याबद्दल आणि व्यग्र वेळापत्रकाबद्दल दीपिकाने कोणतीही तक्रार केलेली नाही. याउलट चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने मिळालेल्या अनुभवामुळे खूप सार्‍या गोष्टी शिकण्याची संधी मिळाल्याचे दीपिकाने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या मुलाखतीत दीपिकाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला आहे. त्यासोबतच तिने प्रियांका सोबतच्या तिच्या नात्यावरही वक्तव्य केले आहे. प्रियांकाशी आपले चांगले संबंध असून तिच्याशी कसलेही शत्रुत्व नसल्याचे दीपिकाने स्पष्ट केले आहे.