चर्चा दिशा पटानीच्या नृत्यकौशल्याची

0
342

मुंबई : अभिनेत्री दिशा पटानीने ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर ती ‘कुंग फू योगा’ यात दिसली होती. आपल्या पहिल्या चित्रपटात तिने सुशांत सिंग राजपूतसोबत काम केले तर दुसर्‍यात सोनू सूद आणि हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅनसोबत काम केले. सध्या दिशा तिच्या नृत्याकडे अधिक लक्ष देताना दिसत आहे. नुकताच दिशाने तिच्या नृत्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरलही होत आहे. बर्‍याचजणांनी हा व्हिडिओ शेअर करत दिशाचे नृत्यकौशल्य पाहत त्याला दाद दिली आहे.