गौरी गाडगीळ पदवीधर झाली

0
376

मुंबई : ‘यलो’ चित्रपटात आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणार्‍या गौरी गाडगीळने शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. स्पेशल चाईल्ड गौरी आता पदवीधर झाली आहे. तिने कला आणि समाजशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे. ही गोड बातमी अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने फेसबुकवर शेअर केली आहे. ‘यलो’ चित्रपटात मृणालने गौरीच्या आईची भूमिका साकारली होती. मृणालच्या पोस्टनंतर गौरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मृणाल लिहिते, ‘‘आमची गौरी गाडगीळ आता पदवीधर झाली आहे. कला आणि समाजशास्त्रात तिने पदवी मिळवली, खूप अभिमान वाटतोय्. गौरी आणि तिची आई स्नेहा खर्‍या हिरो आहेत. वडील आणि बहिणीचे योगदानही विसरता येणार नाही. अफलातून कुटुंब. गाडगीळ कुटुंबाचे मनापासून अभिनंदन.’’ महेश लिमये दिग्दर्शित ‘यलो’तील गौरीच्या अभिनयाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराही मिळाला होता. तिने बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करीत रौप्यपदक पटकावले आहेे.