संपत्तीत मुलीचाही समान वाटा : अमिताभ बच्चन

0
274

मुंबई : ‘मी हे जग सोडल्यानंतर माझा मुलगा आणि मुलीमध्ये संपत्तीचं समान वाटप केलं जाईल’, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. समाजात दिली जाणारी स्त्री-पुरुष असमानतेची वागणूक चुकीची असून आपण सर्व समान आहोत असंही अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर हा संदेश शेअर केला आहे. माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या संपत्तीचे माझा मुलगा आणि मुलीमध्ये समान वाटप करा, असे ट्विट बिग बींनी केले आहे.