एसओएसच्या एंजल व रजत बँकॉकला जाणार

0
84

तभा वृत्तसेवा
गडचिरोली, ३ मार्च
स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या दोन विद्यार्थ्यांनी काठमांडू (नेपाळ) येथे नुकत्याच पार पडलेल्या ट्राय नॅशनल आंतरराष्ट्रीय शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत तीन सुवर्णपदकांची कमाई करून शाळेचे नाव उंचावले आहे.
या स्पर्धेत एंजल देवकुले हिने दोन, तर रजत सेलोकर याने एक सुवर्ण पदक पटकाविले आहे.
एप्रिल महिन्यात थॉयलण्डमधील बँकॉक येथे होणार्‍या एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी एंजल देवकुले व रजत सेलोकर यांची भारतीय संघात निवड झाल्याची माहिती स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या प्राचार्या उर्षा रामलिंगम यांनी गुरुवार, २ मार्चला येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
१० ते १४ फेब्रुवारीदरम्यान काठमांडू येथे झालेल्या ट्राय नॅशनल आंतरराष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करीत जिल्ह्याच्या नावलौकिकात भर टाकली
एंजल देवकुले ही सलग तिसर्‍यांदा देशातील कमी वयातील सुवर्णपदक विजेती ठरली असून, तिने आजपर्यंत सलग आठ सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. त्यामुळे ती ‘गोल्डन गर्ल’ या नावाने ओळखली जाते. एंजल व रजत या दोघांची बँकाक येथे होणार्‍या एशियन चॅम्पियनशीपसाठी निवड झाली असल्याचेही प्राचार्या रामलिंगम यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय निखिल तुकदेव, शर्मिश वासनिक, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, शिकई एसोशिएशनचे अध्यक्ष मजहर खान, सचिव रवींद्र गायकी व पालकांना दिले आहे.
(कॅप्शन ः एंजल व रजतसह प्राचार्या उषा रामलिंगम, निखिल तुकदेव, विजय देवकुले, सेलोकर, संदीप पेदापली, शर्मिश वासनिक पान ७ बॅकमध्ये जीडी २ मार्च प्रेस नावाने)