दीर्घ कालावधीनंतर आज दुर्बिणीद्वारे आकाशदर्शन

0
77

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ४ मार्च
खास लोकाग्रहास्तव रविवार, ५ मार्च रोजी चंद्र व शुक्र ग्रहाच्या अवलोकनासाठी, रवींद्र खराबे, १७-स्मृतिशिल्प, महादेवनगर, यवतमाळ येथे सायंकाळी ७ ते १० पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यात प्रत्यक्ष दुर्बिणीद्वारे चंद्राचा पृष्ठभाग, त्यावरील विवरे, टेकड्या इत्यादी स्पष्टपणे पाहता येतील. तसेच चंंद्राप्रमाणेच शुक्रग्रहाचीसुद्धा कला अनुभवता येईल. या संपूर्ण कार्यक्रमात स्काय वॉचग्रुप यवतमाळचे अध्यक्ष रवींद्र खराबे मार्गदर्शन करतील.
आकाशातील ठळक तारे, राशी, नक्षत्रे, अभ्रिका इत्यादी माहिती करून दिली जाईल. ग्रहगोलाविषयी जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे चर्चात्मक स्वरूपात निरसनही केले जाईल. खगोलशास्त्रात करीअर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येईल. हा कार्यक्रम संपूर्णत: नि:शुल्क असून सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी खुला आहे.
अवकाशातील पिंडांबाबत जनसामान्यात बरेच गैरसमज बाळगले जातात. वास्तविक कोणत्याच ग्रहांचा कोणाच्याच जीवनात तथा व्यवहारात हस्तक्षेप नसतो. कोणावरच ग्रहांचे बरेवाईट परिणाम होत नाहीत.
करिता जिज्ञासू, अभ्यासू, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकांनी गैरसमज झुगारून देऊन या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ‘स्काय वॉच ग्रुप’च्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.