आराध्यावरून अभिषेक-ऐश्‍वर्यामध्ये वाद?

0
366

मुंबई : चिमुकली कन्या आराध्या हिच्या करिअरवरून अभिषेक आणि ऐश्‍वर्या बच्चन यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे समजते. यापूर्वी करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिलेल्या इंटिमेट सीन्समुळे अभिषेक व बच्चन कुटुंबीय नाराज झाल्याचे वृत्त गाजले होते. परंतु आता या दोघांच्या भांडणाचं कारण त्यांची मुलगी आराध्या आहे. बालकलाकार म्हणून आराध्याने चंदेरीनगरीत पदार्पण करावे अशी अभिषेकची इच्छा आहे. तिने अभिनय क्षेत्रातील बारकावे शिकून त्यात कौशल्य मिळवावे व एक दिवस अतिशय यशस्वी अभिनेत्री बनावे असे अभिषेकचे स्वप्न आहे. पण, ऐश्‍वर्याला हे अजिबात पसंत नसून आराध्याने प्रसिद्धीच्या झोतापासून दूर रहावे, असे तिचे मत आहे.