कॅटरिनाची पाऊले हॉलीवूडकडे

0
326

मुंबई : कॅटरिना कैफ हिचा टायगर जिंदा है या चित्रपटाची अनेकांना प्रतीक्षा आहे. परंतु या चित्रपटानंतर कॅटरिना हॉलिवूडला रवाना होणार आहे. प्रियंका चोप्रा व दीपिका पदुकोण यांच्यापाठोपाठ कॅटरिनाही हॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमावण्याच्या तयारीत आहे. आयुष्याला केव्हा, कुठे, कधी, कसे वळण मिळेल, याचा नेम नाही. मी कोणत्याही संधीला नाकारले नाही. कदाचित उद्या मी कुठल्याशा हॉलिवूड चित्रपटातही दिसेल. मी नेहमीच उत्कृष्ट प्रोजेक्टवर लक्ष दिले आहे. बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही उत्तम प्रोजेक्टचा भाग होण्याची संधी मला मिळत असेल तर मी ही संधी निश्‍चितपणे घेईल, असे कॅटरिनाने म्हटले आहे. तिची ही बदललेली भाषा बघता कॅटरिना लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करेल, असा अंदाज बांधला जात आहे.